Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pahalgam terror attack in kashmir world leaders reactions donald trump vladimir putin georgia meloni spl

डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन ते जॉर्जिया मेलोनी; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर जगभरातील नेते काय म्हणाले?

Pahalgam attack,: काश्मीरमधील पहलगाममध्ये दुर्देवी असा दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये निष्पाप अशा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत.

Updated: April 23, 2025 10:47 IST
Follow Us
  • Pahalgam attack: काल (२२ एप्रिल २०२५) रोजी काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. (Photo: PTI)
    1/9

    Pahalgam attack: काल (२२ एप्रिल २०२५) रोजी काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. (Photo: PTI)

  • 2/9

    या हल्ल्यात २६ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. (Photo: PTI)

  • 3/9

    २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या तहव्वुर राणाला अमेरिकेने भारताकडे प्रत्यार्पण केल्यानंतर काही दिवसांतच हा हल्ला झाला आहे. (Photo: PTI)

  • 4/9

    दरम्यान, या हल्ल्यावर जगभरातील नेते काय म्हणालेत? याबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Indian Express)

  • 5/9

    भारताबरोबर अमेरिका ठामपणे उभा- डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका
    काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी निषेध व्यक्त केला आहे. काश्मीरमधून खूपच चिंताजनक बातम्या समोर येत आहेत. दहशतवादाविरुद्ध भारताबरोबर अमेरिका ठामपणे उभा आहे. आम्ही मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनतेला आमचे संपूर्ण समर्थन असून सहानुभूती आहे, असे ट्रम्प म्हणाले. (Photo: Indian Express)

  • 6/9

    मृतांप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो – जेडी व्हान्स उपाध्यक्ष, अमेरीका
    उषा आणि मी पहलगाम येथे झालेल्या विनाशकारी दहशतवादी हल्ल्यातील मृतांप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो. काही दिवसांपासून, या देशाचे सौंदर्य आणि लोकांच्या मिळणाऱ्या प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत. या भयानक हल्ल्याचा निषेध आणि आमच्या सर्व संवेदना आणि प्रार्थना तुमच्याबरोबर आहेत. (Photo: Reuters)

  • 7/9

    जॉर्जिया मेलोनी-, इटली पंतप्रधान
    इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही सोशल मीडियावर भारताला पाठिंबा देत त्यांचा संदेश शेअर केला आहे. “इटली मृत नागरिक, जखमी लोक, सरकार आणि सर्व भारतीय लोकांप्रती आपली संवेदना व्यक्त करते,” असे त्या म्हणाल्या. (Photo: Indian Express)

  • 8/9

    व्लादिमिर पुतिन, रशिया राष्ट्राध्यक्ष
    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या संदेशात “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त करत, बळी पडलेल्या नागरिकांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत. (Photo: Indian Express)

  • 9/9

    “या क्रूर गुन्ह्याचे समर्थन कधीच होऊ शकत नाही. आम्हाला अपेक्षा आहे की यामागील गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळेल. दहशतवादाविरूद्ध लढण्यासाठी भारताबरोबर असणाऱ्या सर्वांबरोबर मीही संपूर्ण ताकदीने भारतासोबत आहे असा विश्वास देतो.” (Photo: Indian Express)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsजम्मू आणि काश्मीरJammu And Kashmirडोनाल्ड ट्रम्पDonald Trumpदहशतवादी हल्लाTerror Attackमराठी बातम्याMarathi Newsव्लादिमिर पुतिनVladimir Putin

Web Title: Pahalgam terror attack in kashmir world leaders reactions donald trump vladimir putin georgia meloni spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.