• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pahalgam terror attack funeral three residents of dombivali were killed jammu kashmir photos sdn

Photos: दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या तीन डोंबिवलीकरांना साश्रू नयनांनी निरोप, कुटुंबीयांच्या हंबरड्याने सगळेच गहिवरले

हल्ल्यात तीन भाऊ मारले गेलेल्या डोंबिवलीतील कौस्तुभ लेले यांनी सरकारच्या भपकेबाजपणाला बुधवारी लक्ष्य केले.

Updated: April 24, 2025 10:49 IST
Follow Us
  • Dombivli Pahalgam Terror Attack
    1/11

    काश्मीरमध्ये (Kashmir) गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला असून या वेळी एक पाऊल पुढे जात प्रथमच पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आहे.

  • 2/11

    पहलगाममधील (Pahalgam) ‘मिनि स्वित्झर्लंड’ (Mini Switzerland) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले.

  • 3/11

    पहलगाम हल्ल्यात मंगळवारी ठार झालेले संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघा मावसभावांचे मृतदेह बुधवारी शहरात (Dombivali) आणण्यात आले.

  • 4/11

    भागशाळा मैदानातून फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून अंत्ययात्रा काढण्यात आली.

  • 5/11

    यावेळी कुटुंबीयांनी फोडलेल्या हंबरड्याने सर्वच उपस्थित गहिवरून गेले.

  • 6/11

    दत्तनगर येथील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • 7/11

    यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नेते उपस्थित होते.

  • 8/11

    हल्ल्यात तीन भाऊ मारले गेलेल्या डोंबिवलीतील कौस्तुभ लेले यांनी सरकारच्या भपकेबाजपणाला बुधवारी लक्ष्य केले.

  • 9/11

    ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याची स्वप्ने नंतर दाखवा, आधी भारतीय नागरिकांच्या आयुष्यात सुरक्षित जीवनाचे ‘अच्छे दिन’ येतील हे बघा अशा शब्दांत त्यांनी आपली उद्विग्नता ‘लोकसत्ता’ला दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केली.

  • 10/11

    भपकेबाजपणा, ब्रॅन्डिंग करणे सोडा… बाता करताना देशातील नागरिक किती सुरक्षित आहेत, हेच या हल्ल्यामुळे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.

  • 11/11

    (सर्व फोटो सौजन्य : दीपक जोशी/लोकसत्ता)

TOPICS
काश्मीरKashmir

Web Title: Pahalgam terror attack funeral three residents of dombivali were killed jammu kashmir photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.