• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. robert prevost becomes first american pope to lead the catholic church takes name leo xiv spl

कॅथोलिक चर्चच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन पोपची निवड, रॉबर्ट प्रीव्होस्ट पूर्वी काय करायचे?

Pope Leo XIV: कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट, ६९, यांना दोन दिवसांच्या चर्चेनंतर पोप कॉन्क्लेव्हने २६७ वे पोप म्हणून निवडले आहे. ही ऐतिहासिक निवडणूक चर्चच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे त्याचे कारण म्हणजे ते पहिले अमेरिकन पोप आहेत.

May 10, 2025 13:08 IST
Follow Us
  • Pope election Vatican
    1/9

    गुरुवारी संध्याकाळी (८ मे) व्हॅटिकन सिटी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली. जेव्हा रोमन कॅथोलिक चर्चला नवीन पोप मिळाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर, सेंट पीटर बॅसिलिकाच्या बाल्कनीतून घंटांचा आवाज आला आणि तिथे जमलेल्या हजारो भाविकांनी आनंद साजरा केला. (AP Photo)

  • 2/9

    दोन दिवसांच्या चर्चेनंतर ६९ वर्षीय कार्डिनल रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची चर्चचे २६७ वे पोप म्हणून निवड झाली. ते अमेरिकेतून आलेले पहिले पोप आहेत आणि त्यांनी पोप लिओ चौदावे हे त्यांचे नाव निवडले आहे. (AP Photo)

  • 3/9

    त्यांच्या पहिल्या भाषणात शांती आणि एकतेचा संदेश
    पोप लिओ चौदावे यांनी इटालियन भाषेत आपले पहिले भाषण दिले, ते म्हणाले, “शांतीचा हा संदेश तुमच्या हृदयात स्थान निर्माण करो, हाच संदेश तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि संपूर्ण जगापर्यंत पोहचेल अशी मी प्रार्थना करतो.” (AP Photo)

  • 4/9

    तसेत त्यांनी पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली आणि अनुयायांना न घाबरता पुढे जाण्याचे आवाहन केले. (AP Photo)

  • 5/9

    अमेरिकेपासून व्हॅटिकनपर्यंतचा प्रवास
    शिकागो येथे जन्मलेल्या प्रीव्होस्ट यांना २०२३ मध्ये पोप फ्रान्सिस यांनी कार्डिनल बनवले. त्यांनी व्हॅटिकनच्या डिकास्ट्री फॉर बिशप्समध्ये काम केले आहे, हा एक प्रभावशाली विभाग आहे जो जगभरातील बिशपांच्या नियुक्तीत महत्त्वाची भूमिका बजावतो. (AP Photo)

  • 6/9

    पूर्वी, ते ऑगस्टिनियन ऑर्डरचे प्रमुख होते आणि पेरूमधील चिकलायोचे बिशप म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. या अनुभवाने त्यांना नेतृत्व आणि जागतिक दृष्टिकोन दोन्ही दिले. (AP Photo)

  • 7/9

    मतमोजणीत प्रचंड यश
    या परिषदेत एकूण १३३ कार्डिनल्सनी मतदान केले, ज्यामध्ये प्रीव्होस्ट यांना ८९ मते मिळाली. अनेक वर्षे कोणत्याही अमेरिकन कार्डिनलची पोप म्हणून निवड झाली नाही यामाचे कारण अमेरिकेची जागतिक शक्ती आणि तिची धर्मनिरपेक्ष संस्कृती होती. पण यावेळी तो अडथळा दूर झाला. (AP Photo)

  • 8/9

    ‘लिओ’ नावाचे महत्त्व
    पोप लिओ चौदावे यांनी निवडलेले नाव रोमन कॅथोलिक चर्चच्या इतिहासातील शक्तिशाली आणि वैचारिकदृष्ट्या मजबूत नेत्यांशी संबंधित आहे. (AP Photo)

  • 9/9

    त्या नावाचे सर्वात प्रसिद्ध पोप पोप लिओ तेरावे (१८७८-१९०३) होते, जे त्यांच्या सामाजिक तत्त्वांसाठी आणि बौद्धिक योगदानासाठी ओळखले जातात. (AP Photo)

TOPICS
अमेरिकाAmericaआंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Robert prevost becomes first american pope to lead the catholic church takes name leo xiv spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.