-
पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची जगभर चर्चा झाली आहे. (Photo: AP)
-
भारताच्या लष्कराने वेळोवेळी पत्रकार परिषदेतून ऑपरेशन सिंदूरमधील वस्तुस्थितीची माहिती माध्यमांना दिली आहे.
-
भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर १० मे रोजी दोन्ही देशांकडून शस्त्रविराम झाला. (Photo: AP)
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर शस्त्रविराम करण्यात आला. (Photo: AP)
-
दरम्यान, काल (११ मे २०२५) भारतीय डीजीएमओच्या (DGMO) तीनही सैन्य दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. (Photo: ANI)
-
डीजीएमओ अधिकारी
या पत्रकार परिषदेत लष्करी संचालनाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्ट. जनरल राजीव घई, हवाई दलाचे अधिकारी एअर मार्शल ए. के. भारती आणि नौदलाचे अधिकारी व्हाईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद उपस्थित होते. (Photo: ANI) -
यावेळी मागील चार दिवस चाललेल्या या मोहिमेची पुराव्यांसह सविस्तर माहिती देण्यात आली. ते काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊयात… (Photo: ANI)
-
नेमके लक्ष्य समोर ठेवून कारवाई
लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सुयोग्य समन्वयातून अचूक आणि जलदगतीने मोहिमा फत्ते केल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. ही कारवाई नेमके लक्ष्य समोर ठेवून, मोजूनमापून आणि तणाव वाढणार नाही, हे लक्षात घेऊन करण्यात आली. (Photo: ANI) -
१०० दहशतवादी व ३५ ते ४० सैनिक मारले गेले
भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये किमान १०० दहशतवादी आणि पाकिस्तानचे ३५ ते ४० सैनिक मारले गेल्याची माहिती लष्करी संचालनाचे महानिर्देशक (डीजीएमओ) लेफ्ट. जनरल राजीव घई यांनी दिली. (Photo: ANI) -
दहशतवाद्यांचे म्होरके ठार
पहलगाम हल्ला करणारे आणि त्याचा कट आखणाऱ्यांना योग्य धडा शिकविण्यासाठी या मोहिमेचे अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे घई यांनी स्पष्ट केले. यामध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले असून आयसी-८१४ विमान अपहरण आणि पुलवामा हल्ल्याच्या कटात सहभागी असलेले युसूफ अझर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सिर अहमद यांच्यासारखे दहशतवाद्यांचे म्होरकेही ठार झाले आहेत. (Photo: ANI) -
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
भारताने केलेल्या या कारवाईनंतर पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. सीमेवर तोफगोळ्यांचा मारा आणि महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन-क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले चढविण्यात आले. भारताच्या मजबूत हवाई संरक्षण यंत्रणांनी तसेच सीमेवर तैनात जवानांनी सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. (Photo: ANI) -
जशास तसे प्रत्युत्तर
मात्र या हल्ल्यांना जशास तसे प्रत्युत्तर देणे आवश्यक असल्याने ९ आणि १० मे दरम्यान मध्यरात्री पाकिस्तानी लष्कराच्या आठ ठिकाणांवर निर्णायक हल्ले चढविल्याची माहिती एअर मार्शल भारती यांनी दिली. (Photo: ANI) -
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीची विनंती
यामुळे पाकिस्तानच्या महत्त्वाच्या धावपट्ट्या आणि रडार यंत्रणांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पाकिस्तानची संरक्षण आणि हल्ल्यांची क्षमता क्षीण झाली व त्यांना शस्त्रसंधीसाठी हात पुढे करावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.. (Photo: ANI) -
शनिवारी दुपारी शस्त्रसंधीसाठी पहिला फोन हा पाकिस्तानच्या डीजीएमओंकडूनच आपल्याला आल्याचे घई यांनी पुन्हा एकदा सांगितले. आज, सोमवारी दुपारी १२ वाजता त्यांच्याबरोबर पुन्हा चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले. (Photo: ANI)
-
आपले सर्व वैमानिक सुरक्षित
पाकिस्तानची काही लढावू विमाने पाडल्याचे स्पष्ट केले. मात्र ही विमाने भारताच्या हद्दीत येऊच न दिल्यामुळे त्यांचे अवशेष सापडले नसल्याचे ते म्हणाले. भारताची काही विमाने पडल्याचे वृत्त परदेशी माध्यमांनी दिले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भारती म्हणाले, की युद्धामध्ये काही नुकसान अटळ असते. पण आपले सर्व वैमानिक सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Photo: ANI) -
एकीकडे लष्कर आणि हवाई दल आपली कामगिरी चोख पार पाडत असताना नौदलही पूर्णत: सज्ज ठेवण्यात आल्याचे व्हाईस अॅडमिरल प्रमोद यांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात आले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे पुरावे देणारी अशी अनेक छायाचित्रे या सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत दाखविण्यात आली. तसेच भारताच्या सार्वभौमत्वाला यापुढे कुणी आव्हान दिले, तर निर्णायक कारवाई केली जाईल, असा इशारा घई यांनी यावेळी दिला. (Photo: ANI)
पाकिस्तानने शस्त्रसंधीसाठी हात पुढे करण्यामागचे कारण काय? भारतीय लष्कराने ‘सिंदूर’ मोहिमेबद्दल सांगितल्या महत्वपूर्ण गोष्टी…
यावेळी मागील चार दिवस चाललेल्या या मोहिमेची पुराव्यांसह सविस्तर माहिती देण्यात आली. ते काय म्हणाले सविस्तर जाणून घेऊयात…
Web Title: Detailed information about operation sindoor was presented in dgmo press conference india pakistan pahalgam attack spl