-
१२ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाचे एआय १७१ हे बोईंग विमान कोसळले. (Photo: Pexels)
-
या दुर्देवी घटनेमध्ये विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एकाचा जीव वाचला. (Photo: Pexels)
-
तसेच विमान जिथे कोसळले तिथले लोक आणि विमानातील क्रू मेंबर्स अशा इतर ३४ नागरिकांचाही यात बळी गेला. (Photo: Pexels)
-
दरम्यान, आज दिवसभरात देशात तब्बल ३ फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामागची कारणे काय आणि अहमदाबाद दुर्घटनेनंतर घडलेल्या इतर विमानांसंबंधीत घटनांचा आढावा घेऊयात… (Photo: Pexels)
-
अहमदाबाद- लंडन फ्लाईट रद्द (१७ जून २०२५)
अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे फ्लाईट एआय १५९ रद्द करण्यात आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे ते रद्द करण्यात आले आहे. अहमदाबाद विमान अपघातानंतर लंडनला जाणारे हे पहिलेच विमान होते, परंतु उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाडामुळे ते रद्द करण्यात आले. (Photo: Pexels) -
इंडिगोच्या विमानाची नागपुरात इमर्जन्सी लँडिंग (१७ जून २०२५)
केरळमधील कोचीवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानात बॉम्ब असल्याचा संशय आल्याने हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती आहे. हे इंडिगोचे विमान असून, या विमानाने दिल्लीकडे उड्डाण केले होते. नागपूर पोलिसांचे डॉग स्कॉड पथक विमानाची तपासणी करत आहे. (Photo: Pexels) -
एअर इंडियाच्या विमानात बिघाड (१७ जून)
सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरवावे लागले. विमान कोलकाता येथे पोहोचले तेव्हा ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एआय १८० विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उड्डाणाला विलंब झाला. (Photo: Pexels) -
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड (१६ जून)
हाँगकाँगवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या या एका विमानात हवेतच तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे हे विमान हाँगकाँगला परत पाठवण्यात आले. तातडीने हे विमान उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित होते. (Photo: Pexels) -
एअर इंडियाच्या एक्सप्रेसच्या विमानात बिघाड (१५ जून)
युपीतील हिंडन विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात बिघाड झाल्याने टेक-ऑफ थांबवण्यात आले होते. (Photo: Pexels) -
आयएक्स १५११ हे विमान हिंडन विमानतळावरून कोलकाताला जाणार होते. पण त्याला थांबवण्यात आले होते, हे विमान जवळपास २ तास धावपट्टीवर थांबले होते. (Photo: Pexels) हेही पाहा- PM Modi Canada Visit G7 Summit 2025: जी-७ शिखर परिषदेसाठी पीएम मोदी कॅनडामध्ये दाखल; पंतप्रधानांच्या ‘या’ दौऱ्याचे महत्व काय?
देशात मागील पाच दिवसांत विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या ५ घटना; कुठे काय घडलं? वाचा…
अहमदाबाद दुर्घटनेनंतर देशामध्ये घडलेल्या इतर विमानांसंबंधी घटनांचा आढावा घेऊयात…
Web Title: Air india flights technical failure nag increase after ahmedabad plane crash spl