• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. international yoga day 2025 pm narendra modi visakhapatnam one earth one health svk

Photos: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशभरात योग उत्सव साजरा

Happy Yoga Day 2025 आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५: पंतप्रधान मोदींसह २०२५ चा योग दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतात १,००,००० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Updated: June 21, 2025 16:08 IST
Follow Us
  • विशाखापट्टणममधून योग दिनाचे नेतृत्व२१ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला भव्य प्रारंभ केला. जगभरातील १९१ देशांमध्ये साजऱ्या झालेल्या या उपक्रमात लाखो लोक सहभागी झाले होते.'एक पृथ्वी, एक आरोग्य' या संकल्पनेवर भरया वर्षी योग दिनाची थीम होती – 'One Earth, One Health'. पंतप्रधान मोदींनी जागतिक आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी योगाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. सध्या जगभरातील लोक अशांतीचा अनुभव घेत आहेत. अशा या काळात त्यांनी लोकांना स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
    1/13

    विशाखापट्टणममधून योग दिनाचे नेतृत्व
    २१ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला भव्य प्रारंभ केला. जगभरातील १९१ देशांमध्ये साजऱ्या झालेल्या या उपक्रमात लाखो लोक सहभागी झाले होते.
    ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेवर भर
    या वर्षी योग दिनाची थीम होती – ‘One Earth, One Health’. पंतप्रधान मोदींनी जागतिक आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी योगाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. सध्या जगभरातील लोक अशांतीचा अनुभव घेत आहेत. अशा या काळात त्यांनी लोकांना स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

  • 2/13

    योग दिनाच्या पूर्वसंध्येला प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी समुद्रकिनारी पंतप्रधान मोदी सूर्यनमस्कार करतानाची अप्रतिम वाळू कलाकृती साकारली. (प्रतिमा: एएनआय)

  • 3/13

    योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एक विशेष स्मारक टपाल तिकिटाचे अनावरण करून या पर्वाचा गौरव केला. (प्रतिमा: पीटीआय)

  • 4/13

    राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “योग सर्वांसाठी आहे. तो सीमा, वय, पार्श्वभूमी किंवा क्षमतेपलीकडे जाऊन सर्वांनी करावा असा आहे.” त्यांनी मानवता २.० च्या दिशेने पुढे जाण्याचा संदेश दिला. (प्रतिमा: X)

  • 5/13

    विशाखापट्टणमच्या आरके बीचवर शेकडो तरुण योगासाठी एकत्र आले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू स्वतः मैदानात उतरून जनतेसोबत योगाभ्यासात सहभागी झाले. (प्रतिमा: स्क्रीनग्रॅब/@BJPGujarat)

  • 6/13

    ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला विशेष दिव्यांग रहिवासीही योग करताना दिसले. (प्रतिमा: X)

  • 7/13

    आरके बीचवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात तरुणांनी पुढाकार घेतला. पंतप्रधान मोदींची उपस्थिती आणि सहभागाने हा एक तासाचे योग सत्र अधिक प्रेरणादायी ठरले. (प्रतिमा: स्क्रीनग्रॅब/@BJPGujarat)

  • 8/13

    नौदलाच्या जवानांनी समुद्रात युद्धनौकेवर योग करून एक अनोखा आदर्श मांडला. (प्रतिमा: एएनआय)

  • 9/13

    १४,१००–१४,२०० फूट उंचीवर असलेल्या लेहमधील ठिकाणी जवानांनी योगासने सादर केली. उंचीवरून मिळणारी ही आरोग्य प्रेरणा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली(प्रतिमा: X)

  • 10/13

    गोरखपूरमध्ये आयोजित योग दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “योग हे शरीर, मन व अध्यात्म यांचा संगम आहे. ही आपल्या ऋषींची शिकवण (प्रतिमा: X)

  • 11/13

    ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बीएसएफने अटारी सीमेवर खास योग कार्यक्रमाचे आयोजन करून देशाच्या योग परंपरेला मानाचा मुजरा केला. (प्रतिमा: पीटीआय)

  • 12/13

    पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत, २६ किमी लांब आरके बीचवर झालेल्या भव्य योग सत्रात तीन तरुण योगसाधकांनी गर्दीचे नेतृत्व करीत सर्वांचे लक्ष वेधले. (प्रतिमा: स्क्रीनग्रॅब/@BJPGujarat)

  • 13/13

    देशभरातील १०० प्रतिष्ठित आणि ५० सांस्कृतिक स्थळांवर पर्यटक व स्थानिकांनी मिळून आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ उत्साहात साजरा केला. (प्रतिमा: X)

TOPICS
बातमीNewsभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi News

Web Title: International yoga day 2025 pm narendra modi visakhapatnam one earth one health svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.