-
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मेळावा मुंबईतल्या वरळी या ठिकाणी पार पडला. १९ वर्षांनी दोन भाऊ एकाच मंचावर मराठी भाषेसाठी आले असं त्या दोघांनीही सांगितलं. (फोटो-शिवसेना, उद्धव ठाकरे, फेसबुक पेज)
-
कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणांकडे आहे. पण आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्यात जो काही आंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांची वरळीतल्या कार्यक्रमात भाषणं झाली. राज ठाकरेंनी ही देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
-
या कार्यक्रमात अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र आलेले दिसून आले. (फोटो-उद्धव ठाकरे शिवसेना)
-
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणानंतर ठाकरे कुटुंबाचं फोटोसेशनही झालं.
-
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत असा केला. (फोटो-सोशल मीडिया)
-
उद्धव ठाकरे यांनी जी टीका केली त्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या पंढरपूर या ठिकाणी आहेत. (फोटो-देवेंद्र फडणवीस, फेसबुक पेज)
-
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना रुदाली असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. मला सांगण्यात आलं होतं की विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषणही झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पाडलं, आम्हाला सत्ता द्या, निवडून द्या हा काही मराठीचा विजय नव्हता, ही रुदाली होतं. या रुदालीचं दर्शन त्या ठिकाणी आपण घेतलं आहे. मुळात त्यांना असूया आहे की २५ वर्षे महापालिका असताना दाखवण्यालायक ते काहीही काम करु शकले नाहीत.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना म्हणाले अनाजीपंत, देवेंद्र फडणवीसांनी ‘रुदाली’ म्हणत उडवली खिल्ली!
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा घेतला समाचार, भाजपावर टीका, फडणवीसांनी एका शब्दात उडवली खिल्ली.
Web Title: Uddhav thackeray said devendra fadnavis is like anjaipant devendra fadnavis also made fun of him called him rudali scj