-
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक खळबळजनक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संजय राऊत यांनी सदर व्हिडीओ एक्सवर शेअर केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली.
-
मंत्री संजय शिरसाट आपल्या घरात बनियनवर बसले असून त्यांच्या हातात सिगारेट दिसत आहे. तसेच घरात एका कोपऱ्यात पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. यामुळे एवढे पैसे कुठून आले? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
-
संजय शिरसाट यांनी स्वतः यानंतर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, हा व्हिडीओ माझ्या घरातीलच आहे. पण त्या बॅगेत पैसे नसून माझे कपडे आहेत. मी दौऱ्यावरून आल्यानंतर गरात निवांत बसलो होतो.
-
या घटनेवर शिवसेनेचे (ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हा व्हिडीओ कुणीतरी जवळच्याच माणसाने काढला असणार.
-
भास्कर जाधव म्हणाले, हे तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारमध्ये एकमेकांचा पत्ता कापण्याचे काम सुरू झाले आहे. धनंजय मुंडे यांचा पत्ता कापून झाला. त्यानंतर जयकुमार गोरेंची विकेट पडता पडता राहिली.
-
आता संजय शिरसाट यांची विकेट पडली पाहिजे, म्हणून त्यांच्या अंतर्गत राजकारणातूनच हे सर्व घडत आहे, अशी शंका भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.
-
संजय शिरसाट यांना दोन दिवसांपूर्वी प्राप्तीकर विभागाची नोटीसही आली होती. यावर भास्कर जाधव म्हणाले, प्राप्तीकर विभागाला ही उघडी बॅग दिसली नाही का? फक्त नोटीस देऊन काय होणार?
-
संजय शिरसाट यांच्यावरील शुक्लकाष्ठ गेल्या काही दिवसांपासून संपायला तयार नाही. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाविरोधात एका महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने तक्रार मागे घेतली.
-
संजय शिरसाट यांच्या मुलाच्या नावाने हॉटेल खरेदी करण्याचा प्रयत्न आणि शासकीय जमीन कवडीमोल दराने विकत घेतल्याचे प्रकरणही काही दिवसांपूर्वी चर्चेत होते. यानंतर आता पुन्हा हा व्हिडीओ आल्यामुळे शिरसाट अडचणीत सापडले आहेत.
“संजय शिरसाट यांचा पत्ता कापण्यासाठी…”, व्हायरल व्हिडीओनंतर भास्कर जाधव यांचं खळबळजनक विधान
Bhaskar Jadhav on Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाट यांच्या घरातील पैशांनी भरलेल्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी मोठे विधान केले आहे.
Web Title: Shiv sena leader bhaskar jadhav big statement on sanjay shirsat viral video of cash bag kvg