-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहिणी खडसे यांना पाठिंबा दर्शवणारी पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
-
‘वेळ संघर्षांची असो की प्रत्यक्ष लढ्यांची… मी तुमच्या सदैव सोबत आहे’, असे लिहित त्यांनी ठाम पाठिंबा व्यक्त केला आहे.
-
ही पोस्ट सध्या चर्चेत असलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणाशी संबंधित आहे
-
या रेव्ह पार्टी प्रकरणात रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचे नाव आले आहे.
-
पुण्यातील खराडीतील एका सोसायटीतील रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला होता.
-
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांनाही अटक करण्यात आलेली आहे.
-
प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सात जणांचा यात समावेश असून यातील पाच जणांना दोन दिवसांची पोलिस कोठडी तर दोन महिलांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
“मी तुमच्या सदैव सोबत आहे…”; रेव्ह पार्टीप्रकरणी सुप्रिया सुळेंचा रोहिणी खडसेंना पाठिंबा, पोस्ट करत म्हणाल्या….
“मी तुमच्या सदैव सोबत आहे…”; रेव्ह पार्टीप्रकरणी सुप्रिया सुळेंचा रोहिणी खडसेंना पाठिंबा
Web Title: Supriya sule supports rohini khadse after husband arrest in pune rave party case svk 05