-
नाईट फ्रँकच्या प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीनुसार, बंगळुरूला जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची वाढणारी रिअल इस्टेट बाजारपेठ म्हणून घोषित करण्यात आले आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली १५ व्या क्रमांकावर आहे.
-
दक्षिण कोरियाची राजधानी सियोल (Seoul) हे शहर अव्वल स्थानावर आहे. जे घरांच्या मागणीत वाढ दर्शवते. (Photo source: Canva)
-
जपानच्या टोकियो शहरातील घरांच्या किंमती १२ महिन्यांत १९.८ टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत, ज्यामुळे ते आशियातील महागड्या घरांचे हॉटस्पॉट बनले आहे. (Photo source: Canva)
-
युएईमधील दुबईतील घरांच्या किंमती १५.८ टक्क्यांपर्यंत वाढल्या, ज्यामुळे जागतिक लक्झरी मॅग्नेट म्हणून त्याची प्रतिष्ठा कायम राहिली आहे. (Photo source: Canva)
-
दुबईनंतर भारतातील बंगळुरूने १०.२ टक्के वार्षिक वाढीसह चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. आयटी क्षेत्राच्या भरभराटीमुळे ही वाढ दिसून येत आहे. (Photo source: Canva)
-
फिलीपिन्समधील मनिला शहराच्या वाढत्या उत्पन्नामुळे आणि शहरी विकासामुळे ९.६ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली. (Photo source: Canva)
-
देशाची आर्थिक राजधानी मुंबईने ९.५ टक्क्यांच्या वाढीसह सहावा क्रमांक पटकावला आहे, जो स्थिर वाढ दर्शवित आहे. (Photo source: Canva)
-
थायलंडमधील बँकॉक शहरात करोना महामारीनंतर पर्यटनाला पुन्हा चालना मिळाल्यामुळे मालमत्तेच्या किमती ९.१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. (Photo source: Canva)
-
स्पेनच्या माद्रिदमध्ये ८.१ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. हे युरोपमधील गुंतवणूकदारांच्या वाढत्या आवडीचे संकेत देते. (Photo source: Canva)
-
केनियातील नैरोबीमध्ये घरांच्या किमतीत ७.२ टक्क्यांची वाढ झाली, जी आफ्रिकेतील वाढती रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणी दर्शवते. (Photo source: Canva)
-
स्वित्झर्लंडमधील झुरिच शहराने ६.४ टक्क्यांच्या वाढीसह हनिर्माण क्षेत्रात आपले आकर्षण कायम ठेवले आहे. (Photo source: Canva)
-
आशियातील मालमत्ता आणि आर्थिक केंद्र म्हणून सिंगापूरने ६.२ टक्क्यांची वाढ नोंदवली. (Photo source: Canva)
-
न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरातील ओशिनियामध्ये घरांची मागणी ५.८ टक्क्यांनी वाढली. (Photo source: Canva)
-
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहर जागतिक गुंतवणूकदारांच्या पसंतीचे शहर आहे. त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये इथे ४.८ टक्क्यांची वाढ झाली. (Photo source: Canva)
-
अमेरिकेतील लॉस एंजेलिसची लक्झरी बाजारपेठांमध्ये स्थिरता दिसून येते, त्यामुळे घरांच्या किमती ४.१ टक्क्यांनी वाढल्या. (Photo source: Canva)
-
भारताची राजधानी दिल्लीने ३.९ टक्क्यांच्या वाढीसह १५ वा क्रमांक पटकवला आहे. ज्यामुळे देशाच्या गृहनिर्माण क्षेत्राला आणखी बळकटी मिळाली आहे. (Photo source: Canva)
मुंबई, दिल्ली नाही तर, घरांच्या मागणीत भारतातील ‘हे’ शहर आहे जगभरात चौथ्या क्रमांकावर
नाईट फ्रँकच्या प्राइम ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीनुसार, बेंगळुरूला जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची वाढणारी रिअल इस्टेट बाजारपेठ म्हणून घोषित करण्यात आले आहे.
Web Title: No mumbai or delhi this indian city ranks 4th highest in residential property prices worldwide kvg