-
भारतावर आरोप करणारी, निर्बंध लावू पाहणारी अमेरिकेची दुटप्पी भूमिका सतत समोर येत आहे. अमेरिका भारतावर आरोप करतेय की भारत रशियाकडून तेल खरेदी करून रशियाला युक्रेनविरोधातील युद्धासाठी निधी पुरवतोय. (PC : Reuters)
-
तेल खरेदीचं कारण पुढे करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू केलं असून आणखी २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे. तसेच रशियाबरोबर व्यापार केल्याचा दंड देखील आकारला जाईल असा इशारा दिला आहे. (AI Generatede Imege)
-
भारतावर आरोप करणारी अमेरिका स्वतः मात्र रशियाबरोबर व्यापार करत आहे. रशियाकडून खते आणि रासायनिक पदार्थ आयात करत आहे. (AI Generatede Imege)
-
रशियाबरोबर व्यापार करण्यासह अमेरिका युरोपातील देशांना शस्त्रास्रे विकून मोठ्या प्रमाणात नफा कमावतेय. युरोपातील देश हीच शस्त्रास्रे १० टक्के अधिक किमतीसह युक्रेनला विकून नफा कमावत आहेत. याचाच अर्थ या शस्त्रास्रांच्या व्यवहारातून अमेरिका आणि युरोप दोघेही मोठ्या प्रमाणात पैसे कमावतायत परंतु, टीका केवळ भारतावरच केली जातेय. (PC : White House)
-
व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्याची कबुली
यूएस ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी मान्य केलं आहे की अमेरिका युरोपला शस्त्रे विकते. यापैकी काही शस्त्रास्रे युरोप युक्रेनला १० टक्के अधिक किमतीत विकत आहे. (PC : Maga Voice) -
स्कॉट बेसेंट म्हणाले, “मला वाटतं की अमेरिकेचे अध्यक्ष खूप दक्ष आहेत. आपण युरोपातील देशांना शस्त्रे विकतो. युरोपातील देश हीच शस्त्रे पुढे युक्रेनला विकतात. ट्रम्प आणि युरोपीय देश यातून १० टक्के नफा कमावतात. हेच १० टक्के पैसे आपल्या हवाई सुरक्षेचा खर्च भागवण्यासाठी वापरले जातात.” (PC : AP & AI Generated Image)
-
स्कॉट बेसेंट यांनी सीएनबीसीशी बोलताना भारतावर टीका केली. भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून त्याचे पेट्रोलियम उत्पादनांत शुद्धीकरण करून इतर देशांना निर्यात करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. (PC : X/Rod D.Martin)
-
बेसेंट म्हणाले, “भारत रशियाकडून घेतलेलं तेल विकून लाभ मिळवत आहे. भारतातील काही उद्योगपती स्वस्त रशियन तेल खरेदी करून त्याचं शुद्धीकरण करून त्याच्या विक्रीद्वारे १६ अब्ज डॉलर्सचा नफा कमवत आहेत.” (PC : X/MAGA)
-
चीनला सूट देण्याचं कारण काय?
अमेरिकेने सेकेंडरी टॅरिफ लावण्याचा विचार केला आहे. ज्यामुळे रशियन तेल आयात करणाऱ्या भारतावर अतिरिक्त कर लावले जाऊ शकतात. मात्र, रशियाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा व तेलाची खरेदी करणाऱ्चा चीनला यापासून सूट दिली आहे. यावर बेसेंट म्हणाले की “ट्रम्प प्रशासन चीनकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतंय. रशिया व युक्रेनचा संघर्ष सुरू होण्याच्या आधीपासूनच चीन रशियाकडून ऊर्जा व इतर वस्तूंची आयात करतोय.” (PC : Reuters)
चीन रशियाकडून सर्वाधिक तेल, ऊर्जा आयात करतो तरी ट्रम्प यांचा भारतावरच रोष का? व्हाइट हाऊसमधील मोठ्या अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं…
रशियाबरोबर व्यापार करण्यासह अमेरिका युरोपातील देशांना शस्त्रास्रे विकून मोठ्या प्रमाणात नफा कमावतेय. हीच शस्त्रास्रे पुढे युक्रेनला विकली जातात.
Web Title: Scott bessent says china trading with russia before ukraine war so us looks at from different perspective asc