-

कुख्यात गुंड अरुण गवळी १८ वर्षांनंतर जामिनावर सुटून बाहेर आला आहे. त्यानंतर तो दगडी चाळीत पोहोचला तेव्हाची ही दृष्ये आहेत. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
गवळीवर २००६ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटक झाली होती. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
त्यानंतर २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने गवळीला जन्मठेपेची शिक्षा आणि १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. या निकालाविरोधात त्यांने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते, मात्र २०१९ मध्ये उच्च न्यायालयानेही त्यांना दिलेली शिक्षा कायम ठेवली. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
दरम्यान, डॅडी अशी ओळख असलेला अरुण गवळी दगडी चाळीत पोहोचला तेव्हा तिथे त्याचे कुटुंबिय पोहोचले होते. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
यावेळी अरुण गवळीची पत्नी आशा गवळीही हजर होती. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
दरम्यान, अरुण गवळी पॅरोलवरही बाहेर आलेला आहे. त्याने त्याच्या मुलीच्या लग्नात उपस्थिती लावली होती. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
८ मे २०२० रोजी अरुणची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे लग्न बंधनात अडकले तेव्हा अरुणने त्यांना आशिर्वाद देण्यासाठी उपस्थिती लावली होती. (Photo: Social Media)
-
‘डॅडी’ म्हणून लोकप्रिय असलेल्या गवळीने गुन्हेगारी जगातून राजकारणात प्रवेश केला आणि विधानसभेतही पोहोचला, त्यांने स्वतःचा पक्ष ‘अखिल भारतीय सेना’ स्थापन केला होता. पण गुन्हेगारी कृत्यांमुळे तो जास्त काळ तुरुंगातच राहिला. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर)
-
दरम्यान, वय आणि आरोग्याच्या कारणास्तव गवळीने सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने त्याची याचिका मंजूर करत सत्र न्यायालयाने ठरवलेल्या अटींवर जामीन मंजूर केला. या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार आहे. (एक्सप्रेस फोटो- गणेश शिरसेकर) हेही पाहा-विकास दिव्यकीर्ती ते खान सर; देशातले ‘हे’ ७ शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये एवढे लोकप्रिय का आहेत?
१८ वर्षांनी अरुण गवळी तुरुंगाबाहेर, दगडी चाळीत घुमला ‘डॅडी’चा ‘जय शंभू नारायण’चा नारा
गवळीवर २००६ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्याला अटक झाली होती.
Web Title: Arun gawli released from jail photos from dagdi chawl when he reached the home spl