-
दादरच्या शिवाजी पार्क मैदानाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे.
-
बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई यांच्या स्मृतीरूपाने शिवसेनेकडून उभारण्यात आलेल्या पुतळ्याचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
-
या घटनेनंतर सकाळपासूनच शिवाजी पार्क परिसरात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
-
घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
-
“आज घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. यामागे अशी व्यक्ती असू शकते, ज्याला स्वतःच्या आई-वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटते. कुणातरी लावारिस माणसाने हे केलं असेल. बिहारमध्ये जसा मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न करण्यात आला, असाच कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग हा असू शकेल. तूर्तास पोलिस या प्रकरणी शोध घेत आहेत. पुढे काय होतं आहे आपण पाहू,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
-
उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई तसेच पक्षातील इतर वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते.
-
रंगफेकीच्या या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन विशेष पथके नियुक्त केली आहेत.
-
मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिकांमध्ये मानाचे स्थान असल्यामुळे रंगफेकीच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: Shivsena Uddhav Balasaheb Thackeray/इनस्टाग्राम)
“हा महाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग”, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली शंका
दादरच्या शिवाजी पार्कजवळील प्रवेशद्वारावर उभारलेला मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आज सकाळी रंगफेक झाल्याने चर्चेत आला आहे.
Web Title: Meenatai thackeray statue color thrown uddhav thackeray first reaction on this incident svk 05