-
कोलकातामध्ये मंगळवारी रात्री कोसळलेला मुसळधार पाऊस गेल्या चार दशकातील सर्वाधिक पाऊस असल्याचे समोर आले आहे. यामुळे वीज पडून किमान आठ जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली, शैक्षणिक संस्था बंद कराव्या लागल्या आणि राज्य सरकारने दोन दिवस आधीच पूजा सुट्ट्या जाहीर केल्या.
-
दुर्गा पूजा उत्सवापूर्वी पावसाच्या पाण्याने मंडप पाण्याखाली गेले असल्याने, देवीच्या मूर्ती थोड्या उंचीवर ठेवण्यात आल्या होत्या. (पीटीआय)
-
कोलकातामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. (पीटीआय)
-
कोलकाता सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. पूरामुळे बाजारपेठीतील दुकानेही पाण्याखाली गेली आहेत. एका दुकानदाराने खराब झालेला माल रस्त्यावर फेकला. (पीटीआय)
-
रात्रभर पडलेल्या पावसानंतर पाणी साचलेल्या भागातून एक माणूस हाताने रिक्षा ओढत आहे. (पीटीआय)
-
पावसामुळे कॉलेज स्ट्रीटवर पाणी साचले असताना लोक पुस्तकांच्या दुकानाजवळ उभे आहेत. (पीटीआय)
-
शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहने जात आहेत. (पीटीआय)
-
दुर्गापूजेच्या तयारीदरम्यान दुकानांमध्ये पाणी शिरल्यानंतर दुकानदारांनी आपला माल वाचविण्याची धडपड केली. (पीटीआय)
कोलकातामध्ये पावसाचा कहर; शहर ठप्प, दुकानांमध्ये पाणी साचलं, दुर्गापूजेवर संकट
कोलकातामध्ये १९८६ नंतरचा सर्वाधिक आणि गेल्या १३७ वर्षांतील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस पडला आहे. २४ तासांपेक्षा कमी कालावधीत २५१.४ मिमी पाऊस पडल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
Web Title: Kolkata rains in pictures severe weather paralyzes city shops waterlogged durga puja preparations hit kvg