-
मागच्या आठवड्यात एच-१बी व्हिसाच्या शुल्कात वाढ केल्यानंतर त्याचे पडसाद तंत्रज्ञान कंपन्यांवर दिसले. यामुळे टॉप १० भारतीय कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य २.९९ लाख कोटी रुपयांनी घसरले. मागच्या आठवड्यात बीएसई निर्देशांक २,१९९.७७ अंकानी खाली आला.
-
अमेरिकेने ब्रँडेड आणि पेटंट केलेल्या औषधाच्या आयतीवर १०० टक्के आयातशुल्क लादले आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातील कंपन्यांवर त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले.
-
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे बाजारमूल्य ९७,५९७.९१ कोटींनी घसरून १०,४९,२८१.५६ कोटींवर आले. जे टॉप १० कंपन्यांपैकी सर्वाधिक आहे.
-
रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य ४०,४६२.०९ कोटी रुपयांनी घसरून १८,६४,४३६.४२ कोटी रुपये झाले.
-
इन्फोसिसचे बाजारमूल्य ३८,०९५.७८ कोटी रुपयांनी कमी झाले.
-
HDFC बँकेचे बाजार भांडवल (एमकॅप) ३३,०३२.९७ कोटी रुपयांनी घसरून १४,५१,७८३.२९ कोटी रुपये झाले. तर ICICI बँकेचे बाजार भांडवल २९,६४६.७८ कोटी रुपयांनी घसरून ९,७२,००७.६८ कोटी रुपये झाले.
-
भारती एअरटेलचे बाजारमूल्य २६,०३०.११ कोटी रुपयांनी घसरून १०,९२,९२२.५३ कोटी रुपये झाले. तर LIC चे बाजारमूल्य १३,६९३.६२ कोटी रुपयांनी कमी होऊन ५,५१,९१९.३० कोटी रुपये झाले.
-
हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे बाजार भांडवल ११,२७८.०४ कोटी रुपयांनी घसरून ५,८९,९४७.१२ कोटी रुपयांवर आले.
-
स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजारमूल्य ४,८४६.०७ कोटी रुपयांनी घसरून ७,९१,०६३.९३ कोटी रुपयांवर आले.
ट्रम्प यांच्यामुळं ‘१०’ भारतीय कंपन्यांचं बाजार भांडवल २.९९ लाख कोटींनी घटलं; आज शेअर मार्केटमध्ये काय होणार?
Top 10 Most Valued Firms Market Cap Drops: एच-१बी व्हिसा शुल्कात भरमसाठ वाढ केल्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. तसेच भारतीय रुपयावरही दबाव आला आहे. भारतातील १० मोठया कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट झाली.
Web Title: Top 10 most valued firms lose rs 2 99 lakh crore in market cap tcs infosys see maximum hit kvg