-

शुक्रवारी रात्री आग्रा येथील नागला बुधी भागात झालेल्या एका भयानक अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. या अपघातात एका भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा नेक्सॉन कारने पादचाऱ्यांना चिरडले. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली.
-
रात्री ८:३० च्या सुमारास न्यू आग्रा सिटीच्या हद्दीतील सेंट्रल हिंदी इन्स्टिट्यूटजवळून जाणाऱ्या वाहनाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
-
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबली (३३), भानु प्रताप (२५), कमल (२३), कृष्णा (२०) आणि बंतेश (२१) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. गंभीर जखमी झाल्यानंतर सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करताच सर्वांना मृत घोषित करण्यात आले.
-
जखमींची ओळख पटली असून, राहुल आणि गोलू हे शहरातील रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर शनिवारी सकाळपर्यंत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
-
तपासातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये झोमॅटोमध्ये काम करणारा भानू प्रताप हा फूड डिलिव्हरी बॉय होता.
-
पोलिसांनी सांगितले की, घटनेनंतर लगेचच टाटा नेक्सॉनच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.
-
या दुर्घटनेमुळे आग्रा येथे बेदरकारपणे वाहन चालवणे आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता पुन्हा निर्माण झाली आहे. संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे आणि कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. (All Photos: Indian Express)
आग्रा येथे भरधाव कारने पादचाऱ्यांना चिरडल्याने पाच जणांचा मृत्यू, दोन जखमी
Agra Accident: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील नागला बुधी भागात, शुक्रवारी रात्री सेंट्रल हिंदी इन्स्टिट्यूटजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा नेक्सनने पादचाऱ्यांना चिरडले.
Web Title: Five killed two injured as speeding car runs over pedestrians in agra aam