-

कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सहकुटुंब शासकीय महापूजा केली.
-
“बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव…” या मंत्रमुग्ध वातावरणात पूजा विधी संपन्न झाला. श्री विठ्ठलाच्या चरणी उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
-
यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावचे मानाचे वारकरी रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर यांना शासकीय महापूजेला बसण्याचा सन्मान मिळाला.
-
यावर्षी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलांना शासकीय महापूजेमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते, ही बाब सर्व वारकऱ्यांसाठी आनंदाची ठरली.
-
पूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा तुळशीची माळ घालून सन्मान करण्यात आला.
-
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “गेल्या तीन वर्षांपासून आषाढी वारीसाठी महापूजा करण्याचे भाग्य लाभले आणि यंदा प्रथमच कार्तिकी वारीसाठीही विठुरायाची पूजा करण्याचा योग आला.”
-
उपमुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांना सध्या आस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. नोव्हेंबर महिन्यातही पाऊस पडत असल्याने मोठे नुकसान झाले आहे. विठुराया, आमच्या बळीराजाला सुखी ठेव आणि त्याच्यावरची सर्व संकटे दूर कर,” असे साकडे त्यांनी घातले.
-
या शासकीय पूजेला उपमुख्यमंत्री शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश शिंदे यांच्यासह श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचे विश्वस्त गहिनीनाथ महाराज औसेकर, मंत्री जयकुमार गोरे, भरतशेठ गोगावले आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे/इन्स्टाग्राम)
‘गेल्या तीन वर्षांपासून आषाढी…’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जि.प. शाळेतील मुलांसह विठ्ठलाची पूजा; म्हणाले…
चार पिढ्यांचा सहभाग असलेली भावपूर्ण पूजा; राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विठुरायाच्या चरणी साकडे
Web Title: Dcm eknath shinde kartiki ekadashi pandharpur temple vittal rukmini pooja svk 05