-

अमेरिकेची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे झोहरान ममदानी यांची निवड झाली आहे.
-
न्यूयॉर्कचे सर्वात तरुण (३४ वर्षे) आणि पहिले दक्षिण आशियाई महापौर म्हणून निवडून आल्यानंतर सर्वत्र झोहरान ममदानी यांची चर्चा सुरू झाली.
-
युगांडामध्ये जन्मलेल्या झोहरान ममदानी यांचे पालक भारतीय वंशाचे आहेत. वयाच्या सातव्या वर्षी ते कुटुंबासह न्यूयॉर्कला स्थलांतरित झाले.
-
झोहरान ममदानी यांनी ब्रॉन्क्स हायस्कूल ऑफ सायन्समध्ये शिक्षण घेतले आणि नंतर बोडोइन कॉलेजमधून आफ्रिकाना स्टडीजमध्ये पदवी मिळवली.
-
झोहरान ममदानी आणि त्यांची पत्नी, २७ वर्षीय सीरियन कलाकार रमा दुवाजी यांची भेट हिंज या डेटिंग अॅपवर झाली.
-
ममदानी यांच्या आई मीरा नायर एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका आहेत आणि त्यांचे वडील प्रोफेसर महमूद ममदानी, कोलंबियामध्ये प्राध्यपक म्हणून काम करतात. त्यांचे दोन्ही पालक हार्वर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.
-
राजकारणात येण्यापूर्वी, झोहरान ममदानी यांनी गृहनिर्माण सल्लागार म्हणून काम केले आहे.
-
विरोधकांप्रमाणेच, ममदानी यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत शहर अधिक सुरक्षित आणि परवडणारे बनवण्यावर भर दिला होता.
-
राजकारणात येण्यापूर्वी ममदानी हे रॅपर देखील होते. त्यांनी यंग कॉर्डमम आणि मिस्टर कॉर्डमम या नावांनी अनेक गितांचे सादरीकरण केले आहे. (All Photos: @ZohranKMamdani/X)
रॅपर ते न्यूयॉर्कचे सर्वात तरुण महापौर… कोण आहेत झोहरान ममदानी?
Who Is Zohran Mamdani: अमेरिकेची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे झोहरान ममदानी यांची निवड झाली आहे.
Web Title: Zohran mamdani new york youngest mayor biography rapper turned politician political journey background early life aam