• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. india vs south africa blue wave grips mcg as india thump south africa by 130 runs

आफ्रिकन शिखर सर

Updated: October 8, 2021 15:18 IST
Follow Us
  • इतिहास काहीही सांगत असो, पण एकदा का आम्हाला खिजवले तर इतिहास बदलण्याची धमकही आमच्यामध्ये आहे, हे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दाखवून दिले.
    1/21

    इतिहास काहीही सांगत असो, पण एकदा का आम्हाला खिजवले तर इतिहास बदलण्याची धमकही आमच्यामध्ये आहे, हे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून दाखवून दिले.

  • 2/21

    यारा नदीच्या किनारी वसलेल्या या शहरातल्या लोकांनी आवाजाने मैदान डोक्यावर घेतले होते, सामना ऑस्ट्रेलियात चालला आहे का भारतात हे कळू नये म्हणून!

  • 3/21

    भारतीय क्रिकेटवेडे चाहते जगभरातून मेलबर्नमध्ये रवाना झाले होते. जिकडे बघावे तिकडे निळी जर्सी घातलेले किंवा भारतीय तिरंगा फडकवताना दिसत होते. सामना सुरू व्हायच्या आधीपासून स्टेडियमवर फक्त जयघोष, शिटय़ा, टाळ्या आणि नारेबाजी ऐकू येत होती.

  • 4/21

    कडक ‘कव्हर ड्राइव्ह’ मारत धवनने शतकाला गवसणी घातली. धवनने १६ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर १३७ धावांची अप्रतिम खेळी साकार संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली, तर रहाणेने ६० चेंडूंत ७ चौकार आणि तीन षटकार लगावत ७९ धावा फटकावल्या.

  • 5/21

    भारताचा सलामीवीर रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. ए बी डिव्हिलियर्सच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे त्याला तंबूत परतावे लागले.

  • 6/21

    विराट कोहलीने एकेरी-दुहेरी धावांवर भर देत एक बाजू लावून धरली होती. मात्र, खराब फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला.

  • 7/21

    रोहित शर्मा (०) धावचीत झाल्यावर शिखर धवन डगमगला नाही, त्याने विराट कोहलीच्या (४६) साथीने धावफलक हलता ठेवत संघासाठी विजयाचा पाया रचला.

  • 8/21

    अर्धशतक झळकावल्यावर ५३ धावांवर असताना वेन पार्नेलच्या विसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हशिम अमलाने बॅकवर्ड पॉइंटला धवनचा झेल सोडला आणि त्याने शतक झळकावत त्याचा पुरेपूर फायदा उठवला.

  • 9/21

    हशिम आमलाने अखेर फाईन लेगला शिखर धवनचा झेल टिपला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता.

  • 10/21

    मोहित शर्माने केलेल्या उत्कृष्ट थ्रोमुळे आफ्रिकेचा कर्णधार ए बी डिव्हिलियर्सला तंबूत परतावे लागले.

  • 11/21

    आफ्रिकेचा कर्णधार ए बी डिव्हिलियर्सला मोठी खेळी साकारण्यात अपयश आले.

  • 12/21

    भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ठरावीक फरकाने दक्षिण आफ्रिकेने फलंदाज गमावले आणि त्यांचा डाव १७७ धावांवर संपुष्टात आला. डेव्हिड मिलरने सर्वाधिक ५५ धावांची झुंजार खेळी साकारली.

  • 13/21

    भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ठरावीक फरकाने दक्षिण आफ्रिकेने फलंदाज गमावले आणि त्यांचा डाव १७७ धावांवर संपुष्टात आला. डेव्हिड मिलरने सर्वाधिक ५५ धावांची झुंजार खेळी साकारली.

  • 14/21

    धवन आणि कोहली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी रचली. या वेळी धोनीने चौथ्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेला पाठवले आणि त्यानेही त्याचा चांगलाच फायदा उचलला. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेचा मारा बोथट केला.

  • 15/21

    भारतीय गोलंदाजांनी केलेल्या नियोजनबद्ध माऱ्यापुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

  • 16/21

    आतापर्यंतच्या विश्वचषकात भारताने आफ्रिकेवर एकदाही विजय मिळवला नव्हता. पण या सामन्यात भारताने द. आफ्रिकेला तब्बल १३० धावांनी पराभूत करत चारही मुंडय़ा चीत केले आणि नवीन इतिहास रचला.

  • 17/21

    शिखर धवनने लाजवाब फलंदाजी केली. जेव्हा गरज होती, तेव्हाच तो मोठे फटके खेळला.

  • 18/21

    शिखर धवनचे दमदार शतक, त्याला मिळालेली अजिंक्य रहाणेची सुरेख साथ आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेवर तब्बल १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला.

  • 19/21

    इतिहास हा बदलत नसतो, या वाक्याची अनुभूती पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने दिली असली, तरी त्याच गोष्टीला छेद देत दक्षिण आफ्रिकेला रविवारी भारताने निरुत्तर केले.

  • 20/21

    आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर आनंदित झालेला रोहित शर्मा.

  • 21/21

    कोहलीने डी कॉकचा झेल टिपला व बँडबाजाला सुरुवात झाली. त्यानंतर समर्थकांनी वळून बघितले नाही आणि भारतीय संघाने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. नियमित अंतरावर बळी घेत भारतीय खेळाडूंनी समर्थकांना साजरा करण्याचे कारण दिले व प्रत्येक वेळी आवाज वाढतच गेला, अधिकाअधिक झेंडे फडकायला लागले.

Web Title: India vs south africa blue wave grips mcg as india thump south africa by 130 runs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.