• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. india 12 greatest moments on a cricket field

क्रिकेट इतिहासातील भारताचे १२ अविस्मरणीय क्षण..

भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात टीम इंडियाबद्दल स्वत:च्या अशा काही खास आठवणी मनात घर करून आहेत. अशाच काही भारतीय संघाच्या अविस्मरणीय क्षणांचा संग्रह..

Updated: October 6, 2021 17:18 IST
Follow Us
  • भारताला सन १९३२ साली कसोटी क्रिकेटसाठीची मान्यता मिळूनही संघाला पहिल्या कसोटी विजयासाठी दोन दशक वाट पाहावी लागली. विजय हजारे यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने १९५२ साली इंग्लंडवर १ डाव आणि ८ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विनू मांकड यांनी या कसोटीत १२ विकेट्स घेतल्या होत्या.
    1/12

    भारताला सन १९३२ साली कसोटी क्रिकेटसाठीची मान्यता मिळूनही संघाला पहिल्या कसोटी विजयासाठी दोन दशक वाट पाहावी लागली. विजय हजारे यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने १९५२ साली इंग्लंडवर १ डाव आणि ८ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विनू मांकड यांनी या कसोटीत १२ विकेट्स घेतल्या होत्या.

  • 2/12

    १९७१ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. इंग्लंड दौऱयावर असलेल्या भारतीय संघाने पहिल्यांदाच साहेबांच्या भूमीवर मालिका जिंकली. तीन सामन्यांच्या या मालिकेत फिरकीपटू बीएस चंद्रशेखर यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. चंद्रशेखर यांनी तब्बल ८ विकेट्स मिळवल्या.

  • 3/12

    वेस्ट इंडिजचे कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांच्या विश्वचषक विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साजरी करण्याच्या मनसुब्यांना सुरूंग लावत भारतीय संघाने १९८३ साली पहिला विश्वचषक जिंकला.

  • 4/12

    ऑस्ट्रेलियामध्ये १९८५ साली क्रिकेट वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय संघाने सर्व सामने जिंकून नवा इतिहास रचला होता. अंतिम सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर भारताने मात केली होती.

  • 5/12

    १९८८ साली ‘कोका कोला कप’च्या अंतिम सामन्यात प्रेवश करण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात सचिन तेंडुलकरने १४३ धावांची तुफान खेळी केली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी सचिनने पुन्हा एकदा अंतिम सामन्यात १३४ धावांच्या खेळीने शेन वॉर्नची झोप उडाली होती. ही एकदिवसीय मालिका सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाची संघर्षमय लढाई म्हणून ओळखली जाते. शारजाहमधील सचिनची त्या झंझावाती खेळीचा उल्लेख आजही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू वादळी खेळी म्हणून करतात.

  • 6/12

    २००१ साली कोलकातामध्ये झालेला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना द्रविड-लक्ष्मणच्या खेळीने गाजला. प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४४५ धावा केल्या. याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा पहिला डाव १७१ धावांत आटोपला आणि फॉलोऑनची नामुष्की ओढावली. अशावेळी व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि राहुल द्रविड भारतीय संघासाठी तारणहार ठरले. लक्ष्मणने २८१ तर, द्रविडने १८० धावा ठोकल्या. अखेरीस भारताने ही कसोटी जिंकली.

  • 7/12

    २००२ सालच्या नेटवेस्ट मालिकेत अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताने विजय प्राप्त केल्यानंतर कर्णधार सौरभ गांगुलीने टी-शर्ट भिरकावून साजरा केलेला विजयी जल्लोष आजही भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अविस्मरणीय आहे. इंग्लंडच्या ३२६ धावांचा पाठलाग करताना भारताची १४६/५ अशी अवस्था झाली होती. भारताच्या युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी सामन्याला कलाटणी दिली. दोघांच्या महत्त्वपूर्ण खेळीने सामना टीम इंडियाने जिंकला.

  • 8/12

    २००३ सालच्या विश्वचषकात सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाच्या रुपाने वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषक उंचावण्याची संधी आली होती. परंतु, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताच्या स्वप्नांचा चुराडा केला. अंतिम सामन्यापेक्षा या विश्वचषकातील पाकिस्तान विरुद्धची लढत भारतासाठी उल्लेखनीय ठरली. भारतीय संघाने विश्वचषकात २२२ धावसंख्येवरील लक्ष्य केव्हाच गाठले नव्हते. यावेळी पाकिस्तानने दिलेले २७४ धावांची आव्हान टीम इंडियाने गाठले. सचिनने ९८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली विशेष म्हणजे वकार युनिस, वसिम अक्रम आणि शोएब अख्तर या गोलंदाजीच्या तोफखान्याचा भारतीय फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला.

  • 9/12

    २००४ साली तब्बल १५ वर्षांनंतर भारतीय संघ पाकिस्तान दौऱयावर गेला होता. भारतीय संघाने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला त्यांच्या मायभूमीत ३-२ अशी धूळ चारली तर, कसोटी मालिकेत भारताने २-१ असे वर्चस्व गाजवले. भारतीय संघाचा सलामीवीर विरेंद्र सेहवागने कसोटी सामन्यात ठोकलेल्या ३०९ धावांच्या ऐतिहासिक खेळीसाठी हा दौरा अविस्मरणीय ठरला.

  • 10/12

    द.आफ्रिकेत झालेल्या पहिल्या-वहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचे नेतृत्त्व महेंद्रसिंग धोनीकडे दिले जाईल याची कल्पनाही कोणाला नव्हती. तसेच हा युवा संघ विजेतेपदावर नाव कोरले हे तर कोणाच्या ध्यानीमनी देखील नव्हते. त्यात अंतिम सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर मात केल्यामुळे हा पहिला-वहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक भारतासाठी महत्त्वाचा ठरला.

  • 11/12

    २००१ साली भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडेवर पुन्हा एकदा इतिहास रचला. तब्बल २० वर्षांची विश्वविजेतेपदाची प्रतिक्षा संपली आणि क्रिकेटवीर सचिन तेंडुलकरचे स्वप्न देखील पूर्ण झाले. भारतीय संघाने मोठ्या दिमाखाने दुसऱयांदा विश्वचषक उंचावला.

  • 12/12

    २०११ सालचा विश्वचषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक या आयसीसीच्या महत्त्वाच्या दोन स्पर्धा जिंकल्यानंतर इंग्लंडच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचेही विजेतेपद धोनी ब्रिगेडने आपल्या खात्यात जमा केले.

TOPICS
टीम इंडियाTeam India

Web Title: India 12 greatest moments on a cricket field

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.