-
एस.एस. राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपट शुक्रवारी जगभरातील चार हजार चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. अंदाजे दोनशे कोटी रुपयांचे या चित्रपटाचे बजेट असल्याचे बोलले जात आहे. तसेच या चित्रपटात दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता प्रभास हा मुख्य भुमिकेत असून राणा दाग्गुबाटी, राम्या क्रिश्ना, अनुष्का व तमन्ना हे कलाकारही चित्रपटात पहायला मिळतील.
-
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘एथिरन’ या चित्रपटाचे बजेट तब्बल १३२ कोटी इतके होते. या चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्टसवर मोठ्याप्रमाणात खर्च करण्यात आला होता.
-
‘धुम-३’ हा आयमॅक्स मोशन पिक्चर फिल्म फॉर्मेटमध्ये बॉलीवूडचा पहिला चित्रपट होता. १२५ कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट २०१३मधील सर्वात महागडा चित्रपट ठरला होता.
रोमँटिक थ्रिलर प्रकारातील ‘आय’ या तामिळ चित्रपटाचे बजेट १०० कोटी इतके होते. -
रजनीकांत आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘कोचादियन’ हा चित्रपट थ्रीडी प्रकारात बनविण्यात आला होता. मोशन कॅप्चर तंत्रज्ञान वापरण्यात आलेल्या या चित्रपटाचे बजेट तब्बल १२५ कोटी इतके होते.
-
बॉलीवूडचा सर्वात खार्चिक चित्रपट म्हणून ‘रा.वन’ ओळखला जातो. शाहरूख खान आणि करीना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्टमुळे चित्रपटाचे बजेट तब्बल १२५ कोटीवर पोहचले होते.
-
इंडियन सुपरहिरो म्हणून ओळख असलेल्या ‘क्रिश-३’ ला प्रेक्षकांची विशेष करून बच्चेकंपनीची चांगलीच पसंती मिळाली होती. ह्रतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे बजेट ११५ कोटी इतके होते.
-
१९६० साली आलेला ‘मुगल-ए-आझम’ हा चित्रपट अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला होता. या चित्रपटासाठी त्याकाळी तब्बल दीड कोटी रूपये खर्च करण्यात आले होते.
-
कमल हसनच्या विश्वरूपम या प्रसिद्ध चित्रपटाचे बजेट तब्बल ९५ कोटी इतके होते. या चित्रपटातील तांत्रिक बाबी हाताळण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
-
मीना कुमारी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पाकीझा’ हा चित्रपट सत्तरच्या दशकात मोठ्या बजेटचा सिनेमा ठरला होता.
-
‘पुली’ या आगामी तामिळ चित्रपटात श्रीदेवी आणि तामिळ सुपरस्टार विजय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नोव्हेंबर २०१४मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून चित्रपटाच्या बजेटचा आकडा ११८ कोटींवर पोहचण्याची शक्यता आहे.
-
१९९८ मध्ये ऐश्वर्या रायची प्रमुख भूमिका असलेला ‘जीन्स’ या चित्रपटाच्या निर्मितीवर तब्बल १९ कोटी खर्च करण्यात आले होते. मात्र, हा चित्रपट व्यवसायिकदृष्ट्या तितकासा यशस्वी ठरला नव्हता. १९९८च्या अॅकॅडमी पुरस्कारांध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाचे नामांकन मिळाले होते.
-
अजय देवगण आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका असणारा ‘राजू चाचा’ हा चित्रपटदेखील बॉलीवूडच्या बिग बजेट चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटाच्या निर्मितीवर तब्बल २५ कोटी खर्च करण्यात आले होते. ‘राजू चाचा’मधील एका गाण्यासाठी तब्बल ४००० मुले, स्पेशल इफेक्टस, हेलिकॉप्टरमधून घेण्यात आलेली दृश्ये आणि स्पेशल इफेक्टस अशी बरीच मेहनत घेण्यात आली होती.
-
१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘रूप की रानी चोरो का राजा’ या चित्रपटाचे बजेट नऊ कोटी इतके होते. मात्र, बराच काळ रेंगाळल्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अयशस्वी ठरला होता.
सर्वात महागडे भारतीय चित्रपट
हिंदी चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात निर्मितीच्यादृष्टीने सर्वात महागडे ठरलेले चित्रपट.
Web Title: Baahubali enthiran raone most expensive indian films