• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. patidar protests curfew in several parts of gujarat

फोटो गॅलरी : गुजरातमध्ये हिंसेचं लोण

पटेल समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करत असलेला तरूण नेता हार्दिक पटेल याला मंगळवारी रात्री पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्याची बातमी पसरताच आंदोलनाला हिंसक वळण लागले.

Updated: October 6, 2021 13:20 IST
Follow Us
  • पटेल समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी तरूण नेता हार्दिक पटेल याच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी अहमदाबादमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या सभेनंतर हार्दिक पटेल याला मंगळवारी रात्री पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्याची बातमी पसरताच आंदोलनाला हिंसक वळण लागले. (छाया-पीटीआय)
    1/8

    पटेल समाजाचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी तरूण नेता हार्दिक पटेल याच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी अहमदाबादमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. या सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या सभेनंतर हार्दिक पटेल याला मंगळवारी रात्री पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्याची बातमी पसरताच आंदोलनाला हिंसक वळण लागले. (छाया-पीटीआय)

  • 2/8

    हार्दिक पटेलला पोलीसांनी सोडून दिल्यावरही दंगेखोर ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी ‘गुजरात बंद’ची हाक देण्यात आली आहे. (छाया-पीटीआय)

  • 3/8

    गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. (छाया-पीटीआय)

  • 4/8

    राजधानी अहमदाबादमध्येही हिंसेच लोण पसरले असून, शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (छाया-पीटीआय)

  • 5/8

    आंदोलनकर्त्यांमुळे सूरत, वडोदरा, अहमदाबाद, मेहसाना, पोरबंदर या जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणच्या शाळा आणि महाविद्यालयांना बुधवारी सुटी देण्यात आली आहे. (छाया-पीटीआय)

  • 6/8

    आंदोलकांनी राज्य महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करीत त्या पेटवून देण्यास मंगळवारी रात्री सुरुवात केली. (छाया-पीटीआय)

  • 7/8

    पोरबंदर जिल्ह्यात आंदोलनामुळे राज्य महामंडळाची बस वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जमावबंदी आदेशही लागू करण्यात आले आहेत. (छाया-पीटीआय)

  • 8/8

    सूरतमध्ये हिंसाचाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे तेथील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. निमलष्करी दलाचे जवान शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. (छाया-पीटीआय)

TOPICS
गुजरातGujaratजमावबंदीCurfewहार्दिक पटेलHardik Patel

Web Title: Patidar protests curfew in several parts of gujarat

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.