-

जगातील प्रभावशाली नेत्यांमध्ये समावेश असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात येणार आहे.
-
हा पुतळा तयार करण्यासाठी मादाम तुसाँच्या कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोजमाप घेतले.
-
मोदींच्या शरीराचे मोजमाप, केस-त्वचेचा रंग, बोटांचे ठसे, पेहराव इत्यादी गोष्टींची माहिती घेण्यासाठी मादाम तुसाँतर्फे एक पथक दिल्लीत आले होते.
-
मोदींची ओळख असलेला कुर्ता, क्रीम रंगाचं जॅकेट अशा पारंपरिक पेहरावात मोदींचा पुतळा असेल. हात जोडून नमस्कार करणारा असा पंतप्रधानांचा पुतळा असेल.
-
मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये जगभरात नाव कमवलेल्या व्यक्तींच्या पुतळ्यांचा समावेश आहे. मात्र माझा पुतळा त्यांच्या शेजारी उभा करण्याच्या योग्यतेचा कसा? मात्र मतदानाने माझी निवड झाल्याचे समजल्याने मी कृतकृत्य झालो.’ अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या.
-
एप्रिल महिन्यात या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
-
यापूर्वी अनेक भारतीय सेलिब्रेटींचे पुतळे मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात आले आहेत.
-
Narendra Modi : जगातील प्रभावशाली नेत्यांमध्ये समावेश असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मेणाचा पुतळा लंडनमधील मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात येणार आहे.
मादाम तुसाँमध्ये मोदींचा पुतळा
Web Title: Narendra modi gets himself measured for madame tussauds