-

मुंबईच्या दादर परिसरात कोकणनगर गोविंदा पथकाने रस्त्यावर आडवे झोपून नऊ थरांची हंडी रचली. (छाया- निर्मल हरिन्द्रन)
-
अनेक गोविंदा पथकांनी चार थर लावून हंडीला सलामी दिली. (छाया- निर्मल हरिन्द्रन)
-
गोविंदा पथकांनी आज उत्साहात रस्त्यावर उतरत अनोख्या पद्धतींनी न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. चौथ्या थरावरील गोविंदांच्या हातात काळे झेंडे दिसत होते. (छाया- निर्मल हरिन्द्रन)
-
हंडी फोडतानाही गोविंदा पथकांनी शिडी आणली होती. (छाया- निर्मल हरिन्द्रन)
-
मानवी थर न रचता गोविंदा पथकांनी हंडी फोडण्यासाठी शिडी लावली होती. (छाया- निर्मल हरिन्द्रन)
-
गोविंदा पथकाच्या प्रशिक्षकांनी शिडीवर चढून ही हंडी फोडली. (छाया- निर्मल हरिन्द्रन)
-
शिडिवर चढून काळे झेंडे फडकवण्यात आले. (छाया- निर्मल हरिन्द्रन)
-
ठाण्यात पोलिसांनी समज दिल्यानंतर मनसेची ४० फुटांवरील दहीहंडी खाली घेण्यात आली. (छाया- निर्मल हरिन्द्रन)
-
दहीहंडीच्या उंचीवर २० फुटांची मर्यादा घालण्याचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवल्यामुळे गोविंदांच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र, गोविंदा पथकांनी आज उत्साहात रस्त्यावर उतरत अनोख्या पद्धतींनी न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. (छाया- निर्मल हरिन्द्रन)
निषेधाचे थर : काळे झेंडे, शिडी आणि मोजपट्टी
संपूर्ण मुंबईत ‘निषेधाचे धर’ लावल्याचे चित्र दिसत आहे.
Web Title: Dahi handi celebrations continue in mumbai