• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. fathers day 2017 10 must have fathers day gifts ideas grilling golf gadgets

Fathers day 2017 : १० अनोखे गिफ्ट्स तुमच्या बाबांसाठी

June 18, 2017 01:05 IST
Follow Us
  • असं म्हणतात की जसजसं वय वाढतं तसतसं वडिलांबरोबरच्या नात्याचं मैत्रीत रुपांतर होत, मग ती मुलगी असो अथवा मुलगा. आपलं आपल्या वडिलांवर खूप प्रेम असल्याच आपण सर्वच जाणतो. यावेळी ते भेटवस्तू रुपाने व्यक्त करण्यात काय हरकत आहे? जून महिन्यातील तिसरा रविवार हा ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. पालकांमध्ये वडील दुर्लक्षित असल्याचं अनेक ठिकाणी दिसून येतं. कुटुंबाच्या सुखासाठी रात्रं-दिवस काबाडकष्ट करणाऱ्या कणखर बाबांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी पर्यटनासाठी नेऊन अथवा त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थाचा बेत आखून या फादर्स-डेला बाबांप्रती प्रेम भावना व्यक्त करायला काहीच हरकत नाही. त्यांच्या आवडीचे एखादे पुस्तकं, वस्तू अथवा छानसे ग्रीटिंग कार्डदेखील भेट म्हणून तुम्ही देऊ शकता. तुमचं काम सोप करण्यासाठी आम्ही सुचवत आहोत काही अनोख्या कल्पना.
    1/

    असं म्हणतात की जसजसं वय वाढतं तसतसं वडिलांबरोबरच्या नात्याचं मैत्रीत रुपांतर होत, मग ती मुलगी असो अथवा मुलगा. आपलं आपल्या वडिलांवर खूप प्रेम असल्याच आपण सर्वच जाणतो. यावेळी ते भेटवस्तू रुपाने व्यक्त करण्यात काय हरकत आहे? जून महिन्यातील तिसरा रविवार हा ‘फादर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. पालकांमध्ये वडील दुर्लक्षित असल्याचं अनेक ठिकाणी दिसून येतं. कुटुंबाच्या सुखासाठी रात्रं-दिवस काबाडकष्ट करणाऱ्या कणखर बाबांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी पर्यटनासाठी नेऊन अथवा त्यांच्या आवडीच्या खाद्यपदार्थाचा बेत आखून या फादर्स-डेला बाबांप्रती प्रेम भावना व्यक्त करायला काहीच हरकत नाही. त्यांच्या आवडीचे एखादे पुस्तकं, वस्तू अथवा छानसे ग्रीटिंग कार्डदेखील भेट म्हणून तुम्ही देऊ शकता. तुमचं काम सोप करण्यासाठी आम्ही सुचवत आहोत काही अनोख्या कल्पना.

  • 2/

    स्वत: मेहनत घेऊन तुम्ही बाबांसाठी एखादे छानसे ग्रीटिंग कार्ड तयार करू शकता.

  • 3/

    बाबांसाठी एखाद्या सरप्राईज पार्टीचे आयोजन करून त्यांच्या आवडीचा पदार्थ बनवू शकता अथवा त्यांच्या आवडीच्या ठिकाणी त्यांना जेवायला घेऊन जाऊ शकता.

  • 4/

    तुमच्या बाबांना ट्रेकिंग, सायकलिंग, बाईकिंग अथवा साहसी खेळात भाग घेण्याची आवड असेल, तर तशाप्रकारची वस्तू त्यांना भेट म्हणून देऊ शकता.

  • 5/

    जर का तुमचे बाबा ‘टेकी’ असतील तर त्यांना लॅपटॉप, कॅमेरा, टॅबलेट अशा स्वरुपाची वस्तू भेट म्हणून देऊ शकता.

  • 6/

    तुमच्या बाबांना जर का वस्तू जमविण्याचा छंद असेल, तर तुम्हीदेखील एखादी वस्तू बाबांना भेट करून त्यांच्या संग्रहात भर घालू शकता. ही अविस्मरणिय आठवण कायम त्यांच्या जवळ एक ठेवा म्हणून राहील.

  • 7/

    बाबांना फोटोग्राफीची आवड असल्यास घरातल्यांबरोबरचे सहलीचे, सण-समारंभाचे आणि अन्य महत्वाचे फोटो-व्हिडिओ जमवून त्याचा छानसा व्हिडिओ तयार करून बाबांबरोबर तो पाहाण्याचा आनंद लुटा. व्हिडिओ संपायला येताच बाबांच्या हातात त्यांच्यासाठी घेतलेला कॅमेरा ठेवा. नक्कीच तो एक भावनात्मक क्षण असेल.

  • 8/

    तुमच्या बाबांना बॅडमिंटन, टेबलटेनिस, कॅरम, क्रिकेट अथवा अन्य कुठल्या खेळाची आवड असल्यास त्यांना तशा स्वरुपाची भेटवस्तू देऊ शकता.

  • 9/

    मचे बाबा उच्चपदस्थ अधिकारी असल्यास आणि त्यांना सतत कंपनीच्या कामानिमित्त मिटिंग, पार्टी अथवा सेमिनारला जावे लागत असल्यास एखादे उंची घड्याळ, शर्ट, पॅन्ट, पर्फ्युम किंवा गॉगलसारखी गिफ्ट देऊ शकता.

  • 10/

    तुमच्या बाबांचे एखादे फेवरेट कॉमिक बुक असेल तर त्यांना त्या कॉमिक बुकची सिरीज भेट म्हणून देऊ शकता. जे त्यांना त्यांच्या बालपणात घेऊन जाईल अथवा त्याच्या फेवरेट सुपरहिरोचे चित्र असलेला टी-शर्ट भेट देऊ शकता.

  • 11/

    बाबांना संगीत, नाटक अथवा चित्रपटाची आवड असल्यास एखाद्या चांगल्या संगीत कार्यक्रमाची, नाटकाची अथवा चित्रपटाची तिकिटं त्यांना भेट करू शकता.

Web Title: Fathers day 2017 10 must have fathers day gifts ideas grilling golf gadgets

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.