
तुम्ही कधी पाण्यावर तरंगणारा बाजार पाहिलात का? कोलकातामध्ये देशातील पहिला पाण्यावर तरंगणाऱ्या बाजाराचं उद्घाटन झालं आहे. दक्षिण कोलकातामधल्या पाटुली परिसरातील तलावावर हा बाजार सामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. -
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते बुधवारी या बाजाराचं उद्घाटन करण्यात आलं. थायलंडमधील फ्लोटिंग मार्केटच्या संकल्पनेवर आधारित या बाजाराची निर्मिती करण्यात आली आहे.
-
२४ हजार चौरस मीटर जागेवरील या बाजाराच्या निर्मितीचा खर्च सुमारे नऊ कोटी रुपये इतका आला आहे.
-
या तरंगत्या बाजारात १०० हून अधिक बोटी आहेत. या बोटींवर फळं, भाज्या, धान्य यांसोबतच मांस आणि मासे यांचीही विक्री करण्यात येत आहे.
-
या बोटींची रचनाही अनोख्या पद्धतीने करण्यात आली आहे. जेणेकरून ग्राहक खरेदी करण्यासाठी एका बाजूने प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने आरामात बाहेर पडू शकतील.
-
फ्लोटिंग मार्केटची संकल्पना थायलंड आणि सिंगापूर या शहरांमध्येही आहे. कोलकातामधील हे फ्लोटिंग मार्केट सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहील.
देशातील पहिला तरंगता बाजार पाहिलात का?
Web Title: West bengal first floating market opens fish meat vegetables fruits on sale