
देशभरात ६९ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असून दिल्लीतील राजपथावर संचलन पार पडले. -
राजपथावरील संचलनात यंदाचं प्रमुख आकर्षण ठरल्या त्या सीमा सुरक्षा दलातील महिला जवानांचे पथक
-
पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलाच्या 'सीमा भवानी' महिला पथकानं संचलन केलं आहे.
-
सीमा भवानी' पथकानं चित्तथरारक कवायती करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
'सीमा भवानी' पथकात महाराष्ट्रातील ९ महिला जवानांचा समावेश आहे.
-
महाराष्ट्रासह पंजाब, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक उत्तराखंड. मेघालय, हिमाचल प्रदेश या राज्यांतील रणरागिणींचाही या पथकात समावेश आहे.
या सर्व महिला जवान २५ ते ३० वयोगटातील आहेत. -
संचलन सोहळ्यानिमित्तानं देशाच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले असून आसियान देशांतील १० देशांचे राष्ट्रप्रमुख सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
राजपथावर ‘सीमाभवानी’च्या चित्तथरारक कसरती
Web Title: Republic day 2018 parade bsf seema bhawani woman motorcycle team wins hearts