-

खग्रास चंद्रग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून असा खास तिहेरी नजराणा ३१ जानेवारी २०१८ रोजी आकाशात पाहायला मिळाला. संपूर्ण जगाने या चंद्रग्रहणाचे 'याचि देही याचि डोळा' दर्शन घेतले. (छाया सौजन्य : प्रवीण खन्ना)
यापूर्वी १५२ वर्षांपूर्वी म्हणजेच ३१ मार्च १८६६ रोजी असा तिहेरी योग जुळून आला होता. (छाया सौजन्य : निर्मल हरिंद्रन) ‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’ या तिहेरी योगात चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येतो. त्यामुळे ३१ जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आल्यानं अधिक मोठा आणि प्रकाशमान दिसत होता. (छाया सौजन्य : पार्थ पॉल) -
खग्रास स्थितीमध्ये संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने चंद्रबिंब लाल दिसत होते. (छाया सौजन्य : पार्थ पॉल)
-
अमेरिकेतून टिपलेले ‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’चे छायाचित्र (छाया सौजन्य : AP)
-
२०१८ नंतर ३१ जानेवारी २०३७ मध्ये 'सुपर-ब्ल्यू-ब्लड मून' पाहाण्याचा तिहेरी योग येणार आहे. टोकियो शहरातून टिपलेले ‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’चे छायाचित्र (छाया सौजन्य : AP)
-
कान येथून टिपलेला ‘सुपर-ब्ल्यू-ब्लड मून’चा तिहेरी नजराणा (छाया सौजन्य : AP)
Lunar eclipse 2018 : त्रिवेणी पूर्णचंद्रदर्शन!
Web Title: Lunar eclipse 2018 super blood blue moon photos