-

गुढी पाडव्यापासून सुरू होणाऱ्या नववर्ष स्वागतासाठी भगव्या रंगाचा ध्वज हाती घेत ढोल ताशांच्या गजरात निघणारी स्वागतयात्रा, थिरकणारी पावले, पारंपरिक वेशभूषा परिधान करत सहभागी होणारे बाल गोपाळ हे चित्र शहरवासीयांना नवीन नाही. यंदा नववर्षांत हे चित्र पुन्हा दिसणार असले तरी त्यात प्रथमच रंग भरले गेले आहेत ते 'रंगवल्ली परिवार'कडून निर्मिलेल्या तब्बल १८ हजार चौरस फूट आकारातील महारांगोळीने. (छाया: दीपक जोशी)
-
नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यातील गावदेवी मैदानात ही महारांगोळी साकारण्यात आली आहे. (छाया: दीपक जोशी)
-
७० कलाकारांनी मिळून ९ तासांच्या अखंड मेहनतीने ही १८ हजार चौरस फुटांची रांगोळी साकारली आहे. (छाया: दीपक जोशी)
-
ही महारांगोळी साकारण्यासाठी तब्बल ९०० किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. (छाया: दीपक जोशी)
-
डोळे दिपवून टाकणारी ही रांगोळी यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने गावदेवी मैदान येथे ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. (छाया: दीपक जोशी)
नववर्ष स्वागतासाठी १८ हजार चौरस फुटांची महारांगोळी
१५ वर्षांच्या कलाकारांपासून ते ८० वर्षांपर्यंतच्या कलाकारांनी साकारली रांगोळी
Web Title: %e0%a5%ad%e0%a5%a6 artists made 18000 square feet long rangoli for gudi padwa in thane