-

जगातील शेवटच्या पांढऱ्या नर गेंड्याचं केनियातील ओल पेजेटा अभयारण्यात निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून त्याची प्रकृती खालावली होती. (छाया सौजन्य: अॅमी विताले)
-
२००९ साली दोन माद्यांसह त्याला झेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणण्यात आलं होतं. तो ४५ वर्षांचा होता. त्याचं नाव सूदान असं ठेवण्यात आलं होतं. (छाया सौजन्य: अॅमी विताले)
-
ओल पेजेटा अभयारण्यातील हे कर्मचारी गेल्या ९ वर्षांपासून सुदानची देखभाल करत होते. (छाया सौजन्य: अॅमी विताले)
-
जगात एकूण चारच पांढरे गेंडे होते. त्यात सूडान हा एकमेव नर होता. त्याच्या सोबत दोन माद्या केनियातील अभयारण्यात आहेत. (छाया सौजन्य: अॅमी विताले)
या प्रजातीच्या वंशवृद्धीसाठी अनेक ब्रीडिंगचे प्रयोग करण्यात आले पण त्यांना फारसं यश आलं नाही. (छाया सौजन्य: अॅमी विताले) -
पांढरे गेडे हे युगांडा, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, सुदान या देशात आढळायचे. पण १९७० आणि १९८०च्या दशकात त्यांच्या बेसुमार शिकारीमुळे ही प्रजाती धोक्यात आली. (छाया सौजन्य: अॅमी विताले)
-
ओल पेजेटा हे अभयारण्य गेंड्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या संक्षणासाठी तसेच तस्करांपासून त्याला वाचवण्यासाठी कडक सुरक्षा पुरवण्यात आली होती. (छाया सौजन्य: अॅमी विताले)
‘सुदान’च्या आयुष्यातील अखेरचे क्षण तुम्हालाही भावूक करतील
२००९ साली दोन माद्यांसह त्याला झेक रिपब्लिक येथून ओल पेजेटा अभयारण्यात आणण्यात आलं होतं.
Web Title: Photos of the last male northern white rhino sudan