-

आजपासून आषाढी वारीचा सोहळा सुरू होत आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरातले वारकरी विठू नामाचा गजर करत सोहळ्यात दाखल झाले आहेत.
-
आषाढी वारीसाठी संतजन व्याकुळ झाले आहेत. पंढरीच्या विठुरायाची ओढ त्यांना लागली आहे.
-
या ओढीनेच लाखो भाविक संतांच्या पालखीत सहभागी होण्यासाठी देहूत दाखल झाले आहेत.
-
आज श्री क्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर पैठणहून एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्थान होणार आहे.
-
सेल्फी काढताना वारकरी
-
सोहळ्यात सर्व प्रकारच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
प्लास्टिकबंदी नंतरची ही पहिलीच वारी आहे. त्यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनीही प्लास्टिकला पर्याय म्हणून वेगवेगळ्या वस्तूंची जोड घेतली आहे.
‘लागली पंढरीची आस’
पुढचे १५ दिवस देहू- आळंदीहून पंढरपूरकडे तहान, भूक विसरून वारकऱ्यांची पावलं चालू लागतील.
Web Title: Ashadhi wari tukaram maharaj palkhi from dehu maharashtra