• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. photos of mumbais marine drive

Fifteen Shades of Marine Drive: १०३ वर्षाचा झाला मुंबईकरांचा ‘हक्काचा कट्टा’

मावळत्या सूर्याला निरोप देत रेंगाळणाऱ्या प्रकाशकिरणांचे कवडसे बघण्याचा आनंद

December 18, 2018 13:46 IST
Follow Us
  • मरिन ड्राइव्ह... म्हटल्यावर मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य येतं. कारण ही जागा प्रत्येक मुंबईकरासाठी खास आहे. अनेकजण मस्करीत म्हणतात मरिन ड्राइव्ह नही देखा तो क्या देखा. हेच मुंबईकरांचे लाडके पर्यटनस्थळ असणारे मरिन ड्राइव्ह आज १०३ वर्षांचे झाले आहे. १८ डिसेंबर १९१५ या दिवशी गिरगाव चौपाटीजवळ पहिला दगड ठेऊन मरिन ड्राइव्ह बांधण्यास सुरुवात करण्यात आली होती. मरिन ड्राइव्हशी प्रत्येकजण वेगळ्या माध्यमातून कनेक्ट होतो. काहीजण प्लॅन करुन भटकायला येतात तर काहीजण एकटेच आत्मचिंतन करत मरिन ड्राइव्हला बसलेले दिसतात. मुंबईत सर्वाधिक सेल्फी क्लिक होणारी ही एकमेव जागा असावी असंही मरिन ड्राइव्हला पाच मिनिटं फिरलं तरी वाटतं. उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा मरिन ड्राइव्हर पर्यटकांच्या आणि समुद्राच्या लाटा येतच असतात. तिन्ही ऋतूंमध्ये मरिन ड्राइव्ह सुंदरच दिसते. म्हणजे स्वच्छ आकाश असो किंवा धुरक्यात हरवलेली मुंबई असो किंवा पावसात ओली चिंब झालेली मुंबई या सर्वच रुपाचं मनमोहक दर्शन मरिन ड्राइव्ह वरुन होते. पाहुयात याच मरिन ड्राइव्हचे असेच काही खास फोटो आणि त्याबद्दलची माहिती...
    1/16

    मरिन ड्राइव्ह… म्हटल्यावर मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य येतं. कारण ही जागा प्रत्येक मुंबईकरासाठी खास आहे. अनेकजण मस्करीत म्हणतात मरिन ड्राइव्ह नही देखा तो क्या देखा. हेच मुंबईकरांचे लाडके पर्यटनस्थळ असणारे मरिन ड्राइव्ह आज १०३ वर्षांचे झाले आहे. १८ डिसेंबर १९१५ या दिवशी गिरगाव चौपाटीजवळ पहिला दगड ठेऊन मरिन ड्राइव्ह बांधण्यास सुरुवात करण्यात आली होती. मरिन ड्राइव्हशी प्रत्येकजण वेगळ्या माध्यमातून कनेक्ट होतो. काहीजण प्लॅन करुन भटकायला येतात तर काहीजण एकटेच आत्मचिंतन करत मरिन ड्राइव्हला बसलेले दिसतात. मुंबईत सर्वाधिक सेल्फी क्लिक होणारी ही एकमेव जागा असावी असंही मरिन ड्राइव्हला पाच मिनिटं फिरलं तरी वाटतं. उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा मरिन ड्राइव्हर पर्यटकांच्या आणि समुद्राच्या लाटा येतच असतात. तिन्ही ऋतूंमध्ये मरिन ड्राइव्ह सुंदरच दिसते. म्हणजे स्वच्छ आकाश असो किंवा धुरक्यात हरवलेली मुंबई असो किंवा पावसात ओली चिंब झालेली मुंबई या सर्वच रुपाचं मनमोहक दर्शन मरिन ड्राइव्ह वरुन होते. पाहुयात याच मरिन ड्राइव्हचे असेच काही खास फोटो आणि त्याबद्दलची माहिती…

  • 2/16

    ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुंबईची दमट हवा सहन होईना. त्यामुळे ब्रिटिश सरकारने अधिकाऱ्यांना ताज्या हवा देण्यासाठी गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटपर्यंतचा अरबी समुद्राचा शेकडो एकर भूभाग मागे हटवून कठडा आणि पाथ-वे बांधण्याचा निर्णय घेतला.

  • 3/16

    ४४० एकर भूभागावर भराव टाकून गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटच्या किनाऱ्यालगत ३.६ किमीचा पाथ-वे पूर्ण झाला. त्यालाच आज आपण मरिन ड्राइव्ह म्हणतो.

  • 4/16

    ब्रिटिश सरकारने अधिकाऱ्यांना ताज्या हवा देण्यासाठी गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटपर्यंतचा अरबी समुद्राचा शेकडो एकर भूभाग मागे हटवून कठडा आणि पाथ-वे बांधण्यात आला.

  • 5/16

    मरिन ड्राइव्हरील या ट्रापॉड्सची एकूण संख्या साडेसहा हजारहून अधिक आहे.

  • 6/16

    वास्तविक पाहता या परिसराची गंमत खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती सूर्यास्तावेळी व त्यानंतर असंख्य दिव्याने झळाळून निघणाऱ्या पिवळ्या रंगातील रोषणाईत!

  • 7/16

    रस्त्याच्या एका टोकाला राज्यपाल, मुख्यमंत्री व अनेक मंत्र्यांची निवासस्थाने आहेत, तर दुसऱ्या टोकाला समुद्रात भराव घालून निर्माण केलेल्या जागेवर विधान भवन, निवासी व व्यावसायिक संकुले उभी आहेत.

  • 8/16

    २०१४ साली मरिन ड्राइव्हलाच प्रजासत्ताकदिनानिमित्त विशेष परेडचे आयोजन करण्यात आले होते.

  • 9/16

    आज हा संपूर्ण रस्ता मरिन ड्राइव्ह नावाने लोकप्रिय असला तरी त्याचे आधीचे नाव सोनापूर असे होते. सामन्यपणे ज्या रस्त्याला मरिन ड्राइव्ह असं म्हटलं जातं त्या रस्त्याचं नाव आहे नेताजी सुभाष चंद्र बोस मार्ग. हा रस्ता मलाबार हिल्सच्या पायथ्याशी असणारा बाबुलनाथ आणि नरिमन पॉइण्ट या दोन भागांना जोडतो.

  • 10/16

    रोज हजारो लोक मरिन ड्राइव्ह पाहण्यासाठी येतात.

  • 11/16

    या रस्त्याला लागून असलेल्या कठडय़ाच्या एका बाजूला अथांग अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला मोकळेपणाने फिरता येईल अशा विस्तीर्ण जागेला लागून सहा पदरी दुहेरी रस्ता आहे.

  • 12/16

    मरिन ड्राइव्हच्या कठड्यावर सतत लाटा धडकत असल्याने हा लाटांचा मार शोषण्यासाठी संपूर्ण परिसरात ट्रायपॉड्सचा वापर करण्यात आला आहे. या दगडांवर बसून अनेक पर्यटक फोटो काढताना दिसतात.

  • 13/16

    मरिन ड्राइव्हची एकूण लांबी ३.६ किमी आहे.

  • 14/16

    वास्तुविशारदांनी आर्ट डेको शैलीचाच वापर करून या परिसराची शान कायम ठेवली

  • 15/16

    १९२० साली बांधून पूर्ण झालेल्या मरिन ड्राइव्हला पहिल्या ७२ वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारच्या डागडुजीची गरज पडली नाही.

  • 16/16

    मरिन ड्राइव्ह व आजूबाजूच्या परिसरातच मुंबईची खरी ओळख दडलेली आहे.

Web Title: Photos of mumbais marine drive

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.