• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. health benefits of eating walnuts sdn

सुक्या मेव्यातील अक्रोड आहे बहुगुणी, जाणून घ्या ‘हे’ फायदे

मधुमेहींसाठी अक्रोड वरदान आहे

November 8, 2019 12:56 IST
Follow Us
  • सुक्या मेव्यातील अविभाज्य घटक अक्रोड. इराणमध्ये उगम असलेले अक्रोड आज भारत, युरोप, अमेरिका, अफगाणिस्तान या सर्व ठिकाणी आढळून येते. अक्रोड फळावरील आवरण हे जाड व कठीण असते. तर अक्रोडचे आतील कवच सुरकुतलेले व दोन भागात विभागलेले असते. या कवचामध्ये मानवी मेंदूशी बरेच साम्य असलेली तेलयुक्त बी असते. त्यामुळे मेंदूच्या दुर्बलतेवर अक्रोड सेवन केले तर मेंदू बलवान होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढीस लागते. हेच अक्रोड अत्यंत पौष्टिक असून त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे दररोज अक्रोडचं सेवन केलं तर अनेक शारीरिक तक्रारींपासून आपण दूर राहू शकतो.
    1/6

    सुक्या मेव्यातील अविभाज्य घटक अक्रोड. इराणमध्ये उगम असलेले अक्रोड आज भारत, युरोप, अमेरिका, अफगाणिस्तान या सर्व ठिकाणी आढळून येते. अक्रोड फळावरील आवरण हे जाड व कठीण असते. तर अक्रोडचे आतील कवच सुरकुतलेले व दोन भागात विभागलेले असते. या कवचामध्ये मानवी मेंदूशी बरेच साम्य असलेली तेलयुक्त बी असते. त्यामुळे मेंदूच्या दुर्बलतेवर अक्रोड सेवन केले तर मेंदू बलवान होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढीस लागते. हेच अक्रोड अत्यंत पौष्टिक असून त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे दररोज अक्रोडचं सेवन केलं तर अनेक शारीरिक तक्रारींपासून आपण दूर राहू शकतो.

  • 2/6

    १. वजन कमी करणे – अक्रोडमध्ये वजन कमी करण्याची क्षमता असते. एका अक्रोडमध्ये जवळपास २.५ ग्रॅम ओमेगा थ्री फॅटी अॅसिड, ४ ग्रॅम प्रोटीन आणि २ ग्रॅम फायबरचं प्रमाण असतं. त्यामुळे एक अक्रोड जरी खाल्ला तरी पोट भरल्याची भावना निर्माण होते. परिणामी वारंवार लागणारी भूक नियंत्रणात येते.

  • 3/6

    २. झोप लागण्यास मदत – अनेक जणांना रात्री लवकरच झोप न लागण्याची समस्या असते. अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी एक अक्रोड खावा. अक्रोडमध्ये झोप येण्यासाठीचे काही गुणधर्म असतात. त्यामुळे रात्री लवकर झोप येते.

  • 4/6

    ३. केसांसाठी उपयुक्त- अनेक जण केसगळतीच्या समस्येने त्रस्त असतात. अशा व्यक्तींनी अक्रोडचं सेवन करावं. आक्रोडमध्ये व्हिटामिन बी-७ चे मुबलक प्रमाण असते. त्यामुळे केसांना मजबूती मिळण्यास मदत होते.

  • 5/6

    ५. हृदयविकासाठी उपयुक्त – अक्रोडमध्ये अॅटी-ऑक्सिडेंट्स आणि ओमेगा थ्रीचं सर्वाधिक प्रमाण असतं. त्यामुळे हृदयविकारामध्ये या अक्रोड अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यासोबतच शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही याची मदत होते.

  • 6/6

    ६. मधुमेहींसाठी फायदेशीर – जे मधुमेही आठवड्यातून २ अक्रोड खातात त्या व्यक्तींना टाईप २चा मधुमेह होण्याची शक्यता २४ टक्क्यांनी कमी होते. त्यामुळे मधुमेहींनी आवर्जुन अक्रोडचं सेवन करावं.

Web Title: Health benefits of eating walnuts sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.