• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. health benefits of drinking green tea sdn

वजन घटवण्यासोबतच ‘ग्रीन टी’चे असेही काही फायदे

November 11, 2019 17:00 IST
Follow Us
  • ग्रीन टी घेतल्याने हे होते, ग्रीन टी घेतल्याने ते चांगले होते असे आपण अनेकदा ऐकतो. महिला तर एखाद्या मैत्रिणीला ग्रीन टीचा फायदा झाला म्हणून मोठ्या उत्साहाने लगेच खरेदीही करतात. पण, अनेकजण उत्साहात ग्रीन टी घ्यायला सुरूवात करतात पण केवळ नव्याचे नऊ दिवस म्हणतात त्याप्रमाणेच. कधी चव आवडली नाही म्हणून तर कधी विसर पडला म्हणून असे अनेक संकल्प सुरु होतात आणि काही दिवसांतच त्यांची नवलाई संपते. पण काही गोष्टी ठरवून विशिष्ट कालावधीसाठी केल्यास त्या निश्चितच फायदेशीर ठरु शकतात. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही गोष्ट नव्याने सुरु करताना त्याबाबत पुरेशी माहिती असलेली केव्हाही चांगली. तर ग्रीन टी घेण्यामुळे होणारे फायदे खालीलप्रमाणे…
    1/6

    ग्रीन टी घेतल्याने हे होते, ग्रीन टी घेतल्याने ते चांगले होते असे आपण अनेकदा ऐकतो. महिला तर एखाद्या मैत्रिणीला ग्रीन टीचा फायदा झाला म्हणून मोठ्या उत्साहाने लगेच खरेदीही करतात. पण, अनेकजण उत्साहात ग्रीन टी घ्यायला सुरूवात करतात पण केवळ नव्याचे नऊ दिवस म्हणतात त्याप्रमाणेच. कधी चव आवडली नाही म्हणून तर कधी विसर पडला म्हणून असे अनेक संकल्प सुरु होतात आणि काही दिवसांतच त्यांची नवलाई संपते. पण काही गोष्टी ठरवून विशिष्ट कालावधीसाठी केल्यास त्या निश्चितच फायदेशीर ठरु शकतात. आरोग्याच्या बाबतीत कोणतीही गोष्ट नव्याने सुरु करताना त्याबाबत पुरेशी माहिती असलेली केव्हाही चांगली. तर ग्रीन टी घेण्यामुळे होणारे फायदे खालीलप्रमाणे…

  • 2/6

    निराशा घालविण्यासाठी फायद्याचा – निराशा कमी करण्यासाठी म्हणजेच आनंदी राहण्यासाठी ग्रीन टी घेतल्यास व्यक्तीचे निराशेचे प्रमाण कमी होते.

  • 3/6

    हृदयरोगासाठी उपयुक्त – रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी तसेच त्या तंदुरुस्त राहण्यासाठी ग्रीनटी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे रक्तदाबाचा त्रासही कमी होण्यास मदत होते. शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यास हृदयरोगाचा धोका असतो. मात्र ग्रीन टी घेतल्याने या गुठळ्या होत नाहीत आणि व्यक्तीचे हृदयरोगाच्या झटक्यापासून संरक्षण होते.

  • 4/6

    अल्झालमर आणि पार्किनसन्सवर उपयुक्त – ग्रीन टीमुळे मेंदूतील पेशी जास्त चांगल्या पद्धतीने काम करतात आणि या पेशी मृत होण्याचे प्रमाण कमी होते.

  • 5/6

    त्वचारोगांसाठी फायदेशीर – वयोमानानुसार शरीरावर सुरकुत्या येतात. या सुरकुत्यांचे प्रमाण कमी राहावे यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये असणारे काही घटक यासाठी फायदेशीर ठरतात. उन्हामुळे शरीरावर येणारे डाग कमी करण्यासाठीही ग्रीन टीचा उपयोग होतो.

  • 6/6

    वजन कमी करण्यासाठी उपयोगी – शरीरातील चयापचय क्रीया सुरळीत करण्याचे काम ग्रीन टी द्वारे केले जाते. खाल्लेल्या अन्नाचे कॅलरीत रुपांतर होत असते. हे प्रमाण योग्य राखण्याचे काम ग्रीन टीच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे वाढलेली चरबी आणि वजन कमी होण्यास ग्रीन टी उपयुक्त आहे.

Web Title: Health benefits of drinking green tea sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.