• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. what are the expensive things used by narendra modi scsg

एक लाखाच्या पेनापासून सव्वा लाखाच्या घड्याळापर्यंत, पाहा मोदींकडील वस्तूंच्या किंमती

मोदी वापरत असलेल्या रोजच्या वापरातील गोष्टींची किंमत किती

December 27, 2019 16:16 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॉगलची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अर्थात देशाचे पंतप्रधान आहेत म्हटल्यावर त्यांच्याकडे महागड्या वस्तू असण्यात काहीच गैर नाही. अनेकदा देशाच्या प्रमुखांना अशा वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. मात्र त्याच वेळी या वस्तूंची किंमत ही सामान्यांना तोंडात बोटे घालायला लावणारी असते. सूर्यग्रहण बघताना मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोवरुन त्यांच्या गॉगलच्या किंमतीची चर्चा रंगली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात मोदींकडे असणाऱ्या काही खास गोष्टी आणि त्यांच्या किंमतीबद्दल...
    1/16

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॉगलची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. अर्थात देशाचे पंतप्रधान आहेत म्हटल्यावर त्यांच्याकडे महागड्या वस्तू असण्यात काहीच गैर नाही. अनेकदा देशाच्या प्रमुखांना अशा वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. मात्र त्याच वेळी या वस्तूंची किंमत ही सामान्यांना तोंडात बोटे घालायला लावणारी असते. सूर्यग्रहण बघताना मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोवरुन त्यांच्या गॉगलच्या किंमतीची चर्चा रंगली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात मोदींकडे असणाऱ्या काही खास गोष्टी आणि त्यांच्या किंमतीबद्दल…

  • 2/16

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आवडणाऱ्या घड्याळाची माहिती त्यांच्या आत्मचरित्रामध्येच दिली होती. मोवाडो (Movado) या स्वीझ लक्झरी ब्रॅण्डची घड्याळे मोदींना आवडतात. मोवाडो या कंपनीची स्थापना १९८३ मध्ये झाली आहे. ही कंपनी मोवाडो, इबेल, कॉकर्ड, ईएसक्यू, कोच, ह्युगो बॉस, लाकोस्ट, जुसी कॉर्चर, टॉमी हीलफिंगर नावाने घड्याळे बनवते. मोवाडोच्या घड्याळांची किंमत ३९ हजारांपासून सुरु होते. त्यामुळे तुम्ही मोदींच्या घड्याळाच्या किंमतीची अंदाज लावू शकता.

  • 3/16

    एप्रिल महिन्यामध्ये अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी घड्याळ उलटं घालण्याच्या सवयीबद्दल माहिती दिली होती. ‘मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’, असा सवाल अक्षयने मोदींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी ‘मी अनेकदा बैठकींमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले तर तो त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घातलो कारण वेळ बघायचा झाल्यास मी लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहतो,’ म्हटलं होतं.

  • 4/16

    घड्याळांप्रमाणेच मोदींना पेनही खूप आवडतात. मोदींकडे पेनचे मोठे कलेक्शन असल्याचं बोललं जातं. मात्र त्यांना Mont Blanc माँट ब्लन्क या जर्मन कंपनीचे पेन खूप आवडतात. मोदी हाच पेन वापरतात. मोदींकडे असणाऱ्या माँट ब्लन्क कंपनीच्या पेनची किंमत एक लाख तीस हजार रुपयांच्या आसपास आहे.

  • 5/16

    माँट ब्लन्क हे युरोपमधील सर्वात उंच शीखराचे नाव असून त्यावरुनच कंपनीचे नाव ठेवण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी या कंपनीने बनवलेल्या एका पेनवर महात्मा गांधींचा फोटो छापण्यात आला होता. या पेनची किंमत १४ लाख इतकी असल्याचं कंपनीने सांगितलं होतं. त्यावरुन शांती आणि सामान्य आयुष्याचा पुरस्कार करणाऱ्या गांधीचा फोटो असणारा पेनची एवढी किंमत ठेवल्यावरुन कंपनीवर टीकेची झोड उठली होती. अमिताभ बच्चन, बराक ओबामा, दलाई लामा, वॉरेन बफे यासारखे अनेक लोकप्रिय व्यक्ती याच कंपनीचा पेन वापरतात.

  • 6/16

    निरंजन मुखोपाद्याय यांनी लिहिलेल्या "नरेंद्र मोदी: द मॅन, द टाइम्स" या पुस्तकामध्ये मोदींच्या गाजेट प्रेमाबद्दल बरीच माहिती देण्यात आली आहे. १९९० च्या दशकामध्ये डिजीटल डायरी वापरणाऱ्या पहिल्या काही लोकांमध्ये मोदींचा समावेश होता. "पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री होण्याआधी मोदींनी मोबाइल फोन कधीच वापरला नव्हता," असंही या पुस्तकात म्हटलं आहे.

  • 7/16

    मोदींना अॅपल कंपनीचे प्रोडक्टचे चाहते आहेत. मुख्यमंत्री असताना अनेकदा त्यांच्या हाती दिसणारा आयफोन नजरेत भरायचा. मोदींचे जगभरातील बड्या नेत्यांबरोबरचे सेल्फी काढतानाचे फोटो आहेत. या फोटोंमध्ये मोदी लेटेस्ट आयफोन वापरत असल्याचे दिसून येते.

  • 8/16

    मोदी फोन कोणता वापरतात हे तर स्पष्ट झालं. पण मोदी कोणत्या कंपनीचे सीम कार्ड वापरतात असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर मोदींनी दोन वर्षांपूर्वी शेअर केलेल्या एका स्क्रीनशॉर्टमध्ये ते व्होडाफोनचे कार्ड वापरत असल्याचे दिसते. दुसऱ्या एका शक्यतेनुसार जगभरातील प्रमुख नेत्यांना सामान्यांप्रमाणे स्मार्टफोन वापरता येत नाही. त्यामुळे मोदी आरएसएक्स (रिस्ट्रीक्टेड एरिया एक्सचेंज) तंत्रज्ञानाच्या मदतीने संरक्षित नेटवर्कच्या माध्यमातून फोनवरुन संवाद साधतात.

  • 9/16

    मोदींना गॉगल्सचीही खूप आवड आहे. मोदी अनेकदा वेगवेगळ्या अनौपचारिक कार्यक्रमांमध्ये गॉगल घालून दिसता. मोदी बुल्गरी या इटालियन ब्रॅण्डचा गॉगल वापरतात. बुल्गरी गॉगल्सची किंमत ३० ते ४० हजार रुपयांच्या दरम्यान असते.

  • 10/16

    मोदींनी गुरुवारी सुर्यग्रहण पाहताना फोटो ट्विटवरुन शेअर केला होता. यावेळी मोदींना घातलेला गॉगल हा मायबॅच आयवेअर या जर्मन कंपनीचा असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. हा एक महागडा परदेशी ब्रॅण्ड असून त्याची किंमत हजारोंमध्ये असते. मात्र मोदींचा गॉगल हा ‘द डिप्लोमॅट वन’ प्रकारातील आहे. या गॉगलची किंमत २ हजार १५९ डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार या गॉगलची किंमत दीड लाखांहून अधिक आहे. आजच्या डॉलरच्या किंमतीनुसार या गॉगलची किंमत एक लाख ५४ हजार ३०३ रुपये इतकी आहे. हा गॉगल भारतामध्ये मागवायचा झाल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. त्यामुळे या गॉगलची भारतातील किंमत ही एक लाख ६० हजारांच्या आसपास असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

  • 11/16

    तर काही मोदी समर्थकांनी सूर्यग्रहण पाहतानाच्या फोटोमधील गॉगल हा मायबॅच आयवेअर कंपनीचा महागडा गॉगल नसून तो ‘रेट्रो बफेलो हॉर्न ग्लासेस’ हा गॉगल असल्याचा दावा केला आहे. हा गॉगल सात ते दहा हाजारांमध्ये उपलब्ध असल्याचे मोदी समर्थकांनी म्हटलं आहे.

  • 12/16

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कपड्यांसाठीही ओळखले जातात. मोदी आजही त्यांची कडपे अहमदाबादमधील जेड-ब्लू यांच्याकडूनच शिवून घेतात. बिपिन आणि जीतेंद्र चौहान यांची ही कंपनी आहे. १९८९ पासून मोदी या दोघांकडूनच कपडे शिवून घेतात. आधी बिपिन आणि जीतेंद्र यांचे एक छोटे दुकान होते आज त्यांनी कंपनीपर्यंत मजल मारली आहे.

  • 13/16

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीप्रसंगी परिधान केलेला वादग्रस्त बंदगळा सूट घातला होता. या सूटवर मोदी मोदी अशी अक्षरे होती. खरेतर या सुटाची नेमकी किंमत कुणालाही माहीत नाही, तरी तो १० लाखांचा असल्याचे मानले जाते. या सूटवर ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असे नाव सोनेरी विणकाम करून कोरलेले आहे.

  • 14/16

    मोदींनी अशापद्धतीने स्वत:च्या नावाचा सूट घातल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधीपक्षांनी तसेच परदेशी प्रसारमाध्यमांनी मोदींच्या या पेरहावाची टीका केली होती.

  • 15/16

    २०१६ साली झालेल्या लिलावामध्ये हा सूट ४.३१ कोटी रूपयांना विकला गेला आहे. हा टू पीस सूट असून तो विकत घेण्यासाठी चढाओढ लागली होती. नेव्ही ब्लू रंगाचा हा सूट असून तो सुरतचे हिरे व्यापारी लालजी पटेल व त्यांचा पुत्र हितेश पटेल याने सर्वोच्च बोली लावून घेतला. पैसा गंगा स्वच्छतेसाठी जाणार असल्याने आम्ही एवढे पैसे खर्च केल्याचं हितेश यांनी स्पष्ट केलं होतं.

  • 16/16

    मोदी अनेक गोष्टी ब्रॅण्डेड वापरत असले तरी ते चप्पल आणि बूट मात्र आपल्या पेहरावाला शोभून दिसणारेच वापरतात. याबद्दल त्यांची वेगळी अशी कोणतीच आवड नसल्याचे समजते.

Web Title: What are the expensive things used by narendra modi scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.