• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. coronavirus see how much efforts doctors and nurses are putting to save us cant you just stay home scsg

खरी देवमाणसं! डॉक्टर आणि नर्सेस आपल्यासाठी काय काय करत आहेत एकदा पाहाच

तुम्ही निदान यांच्यासाठी फक्त घरी थांबण्यासारखं छोटसं काम नाही का करु शकत?

April 10, 2020 16:27 IST
Follow Us
  • सध्या करोनाचा सामना सगळं जग करतं आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर सगळ्या कर्मचाऱ्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. दिवस-रात्र एक करुन आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी करोनाच्या संकट अधिक पसरू नये यासाठी काम करताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये तर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची उदाहरणेही आहेत. असं असतानाही डॉक्टर आणि नर्सेस त्यांचे कर्तव्य पार पडताना दिसत आहेत.
    1/10

    सध्या करोनाचा सामना सगळं जग करतं आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस आणि इतर सगळ्या कर्मचाऱ्यांचं योगदान अनन्यसाधारण आहे. दिवस-रात्र एक करुन आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी करोनाच्या संकट अधिक पसरू नये यासाठी काम करताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये तर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची उदाहरणेही आहेत. असं असतानाही डॉक्टर आणि नर्सेस त्यांचे कर्तव्य पार पडताना दिसत आहेत.

  • 2/10

    करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र लॉकडाउनदरम्यानही अनेकजण उगच बाहेर फिरताना दिसत आहेत. भारतामध्ये त्यातही महाराष्ट्रामध्ये करोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने तेथील परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. एवढं सगळं होऊनही करोनाचं संकट असतानाही अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. (फोटो- आशिष काळे, पुणे)

  • 3/10

    कारण नसताना लॉकडाउनदरम्यान फिरणाऱ्या अशाच लोकांना महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत येणाऱ्या नागपूर विभागाच्या माहिती संचालक कार्यालयाने एक आवाहन केलं आहे. डॉक्टर करोनाशी संघर्ष करत असताना किमान त्यांच्या निदान यांच्या मेहनतीकडे पाहून तरी घरी बसा असं ट्विट @InfoVidarbha या अकाऊंटवरुन कऱण्यात आलं आहे. याबरोबर डॉक्टरांच्या संघर्षाचा माहिती देणारी काही चित्रेही या ट्विटसोबत शेअर करण्यात आली आहेत. ही चित्रं पाहून तुम्हालाही डॉक्टरांच्या कामाचा आणि ते करत असलेल्या बलिदानाचा अंदाज येईल… (या पुढील सर्व फोटो: @InfoVidarbha ट्विटर अकाऊंट)

  • 4/10

    डॉक्टर आपल्याला सुरक्षित भविष्याकडे घेऊन जात आहेत. (फोटो: @InfoVidarbha ट्विटर अकाऊंट)

  • 5/10

    अनेक नर्सेस कुटुंबाऐवजी रुग्णांची काळजी घेण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. (फोटो: @InfoVidarbha ट्विटर अकाऊंट)

  • 6/10

    करोनावर मात करुन फुलांची उधळण (फोटो: @InfoVidarbha ट्विटर अकाऊंट)

  • 7/10

    करोनाची बेडी तोडण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी जीवाचं रान करत आहेत. (फोटो: @InfoVidarbha ट्विटर अकाऊंट)

  • 8/10

    केवळ डॉक्टरच नाही तर अत्यावश्यक सेवा पुरवणारे पोलीस आणि इतर कर्मचारीही करोनाला आवर घालण्याचा प्रयत्न करत आहे. (फोटो: @InfoVidarbha ट्विटर अकाऊंट)

  • 9/10

    करोना आणि तुमच्या आमच्यामध्ये हे हे डॉक्टर्सचे संरक्षण कवच (फोटो: @InfoVidarbha ट्विटर अकाऊंट)

  • 10/10

    रुग्णांना वाचवण्याचे सर्व प्रयत्न डॉक्टर करत आहेत. निदान यांच्या या सर्व मेहनतीकडे पाहून तरी घरी बसा. एवढं तर आपण करुच शकतो नाही का? (फोटो: @InfoVidarbha ट्विटर अकाऊंट)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus see how much efforts doctors and nurses are putting to save us cant you just stay home scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.