-
करोना ही जागतिक साथ आहे. त्याविरोधात लढताना आता आपण अनलॉक २ मघ्ये प्रवेश करत आहोत. पण त्यासोबत आता असा ऋतु आला आहे की ज्या काळात सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे आजार बळावतात. त्यामुळे आपल्याला आता जास्त काळजी घ्यावी लागणार आहे.
-
आपल्याला जबाबदारीनं वागावं लागणार आहे. पण जेव्हापासून अनलॉक १ सुरू झाला तेव्हापासून बेजाबदारपणा वाढला आहे.
-
अनेक लोक लोक आधी मास्क वापरायचे, वेळोलेळी हात धुवायचे. मीटरभराचे अंतर ठेवायचे. आता मात्र, दुसऱ्या अनलॉकमध्ये जाताना लोकांमध्ये बेजाबदारपणा वाढल्याचे दिसते.
-
लॉकडाउनच्या काळात नियमांचं गंभीरतेनं पालन केलं गेलं. आता सरकारी अधिकारी, संस्थांना देशातील नागरिकांना तशाच प्रकारे नियमांचं पालन करून घ्यावं लागणार आहे. त्याच जबाबदारीनं वागावं लागणार आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं.
-
कंटेन्मेंट झोनवर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. जे लोक नियमांच पालन करणार नाही त्यांना टोकावं लागेल, रोखावं लागेल आणि समजून सांगावं लागेल, असंही मोदी म्हणाले.
-
देश असो वा कोणतीही व्यक्ती, वेळेवर आणि संवेदनशीलता ठेवून निर्णय घेतल्याने कोणत्याही संकटाचा सामना करण्याचं बळ येतं.
-
सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यानंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजनाही आणली, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात २० कोटी जनतेच्या जनधन खात्यात सरकारने ३१ हजार कोटी रुपये जमा केले आहेत.
-
९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, असंही मोदी यांनी स्पष्ट केलं.
-
काही दिवसांपूर्वी एका राष्ट्राच्या नेत्याला मास्क न घातल्यामुळे दंड ठोठावण्यात आला. भारतातही आपल्याला अशीच परिस्थिती तयार करायची आहे.
-
गावचा सरपंच असो किंवा देशाचा पंतप्रधान, नियमांच्या पुढे कोणीही मोठं नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी नियम मोडणाऱ्यांना सुनावलं आहे.
-
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार नोव्हेंबरपर्यंत करण्यात आला असून त्यावर ९० हजार कोटी पेक्षा जास्त खर्च होणार आहे.
-
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मागच्या तीन महिन्याचा खर्च जोडला तर ही रक्कम दीड लाख कोटी रुपयांच्या घरात जाते.
-
येत्या काळात काळजी घेऊन अर्थव्यवस्थेला पुढे न्यायचे आहे.
-
लोकलसाठी व्होकल होऊ. आत्मनिर्भर भारतसाठी दिवस-रात्र मेहनत करायची आहे.
-
पंतप्रधानांनी यावेळी चीनच्या विषयावर काहीही भाष्य केले नाही.
पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील पंधरा महत्त्वाचे मुद्दे
Web Title: Ten important points of prime minister narendra modi address to nation dmp