• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. priyanka chaturvedi to shain nc know about women political leaders husband bmh

प्रियंका चतुर्वेदी ते शायना एनसी; राजकारणात ठसा उमटवणाऱ्या महिला नेत्यांचे पती काय करतात?

महत्त्वाच्या पक्षांमध्ये प्रवक्तेपदाची जबाबदारी

Updated: September 10, 2021 14:25 IST
Follow Us
  • भारतीय राजकारणा महिला टक्का कमी असला, तरी स्वकर्तृत्वानं स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या आणि पक्षाची भूमिका मांडणाऱ्या नेत्यापैकी काही महिला नेत्या माध्यमातून सातत्यानं दिसत राहतात. प्रियंका चतुर्वेदी, रागिनी नायक, शायना एनसी, शमा मोहम्मद, शाजिया इल्मी ही काही महिला नेत्यांची नावं आहेत. ज्यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी आहे. राजकारणात स्थिरावलेल्या आणि प्रवक्ते म्हणून भूमिका निभावणाऱ्या या महिला नेत्यांचे पतीही राजकारणातच असतील? असा प्रश्न तुम्हाल पडू शकतो. मात्र, असं नाही, यातील बहुतांश महिला नेत्यांचे पती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात... (फोटो : इन्स्टाग्राम/इंडियन एक्स्प्रेस)
    1/15

    भारतीय राजकारणा महिला टक्का कमी असला, तरी स्वकर्तृत्वानं स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या आणि पक्षाची भूमिका मांडणाऱ्या नेत्यापैकी काही महिला नेत्या माध्यमातून सातत्यानं दिसत राहतात. प्रियंका चतुर्वेदी, रागिनी नायक, शायना एनसी, शमा मोहम्मद, शाजिया इल्मी ही काही महिला नेत्यांची नावं आहेत. ज्यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी आहे. राजकारणात स्थिरावलेल्या आणि प्रवक्ते म्हणून भूमिका निभावणाऱ्या या महिला नेत्यांचे पतीही राजकारणातच असतील? असा प्रश्न तुम्हाल पडू शकतो. मात्र, असं नाही, यातील बहुतांश महिला नेत्यांचे पती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात… (फोटो : इन्स्टाग्राम/इंडियन एक्स्प्रेस)

  • 2/15

    प्रवक्त्या म्हणून राजकीय जबाबदारी सांभाळणाऱ्या या महिला नेत्यांपैकी महत्त्वाचं एक नाव प्रियंका चतुर्वेदी. प्रियंका चतुर्वेदी पूर्वी काँग्रेस पक्षात होत्या. राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून त्या काँग्रेसची भूमिका मांडायच्या.

  • 3/15

    लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. प्रवक्ता म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच शिवसेनेकडून त्यांना राज्यसभेवरही पाठवण्यात आलं. सध्या प्रवक्ता आणि राज्यसभेच्या खासदार आहेत.

  • 4/15

    प्रियंका चतुर्वेदी यांचे पतीचं नाव विक्रम चतुर्वेदी आहे. विक्रम चतुर्वेदी हे सॉफ्टवेअर डेव्हलमेंट कंपनी आयबीएममध्ये मार्केटिंग व प्रोग्राम मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. प्रियंका चतुर्वेदी यांना दोन मुल आहेत. ज्यांची नावं आर्णव व अनित्रा आहे.

  • 5/15

    प्रियंका चतुर्वेदी यांना दोन मुल आहेत. ज्यांची नावं आर्णव व अनित्रा आहे.

  • 6/15

    रागिणी नायक. काँग्रेसची बाजू मांडताना दिसणाऱ्या पक्षातील नेत्यांपैकी एक. रागिणी नायक दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या नेत्या होत्या.

  • 7/15

    रागिणी नायक यांनी अशोक बसोया यांच्यासोबत विवाह केला. अशोक बसोया हे सुद्धा काँग्रेसमध्येच काम करतात.

  • 8/15

    महाराष्ट्र भाजपातील महत्त्वाच्या आणि पक्षाची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी एक नाव म्हणजे शायना एनसी. शायना एनसी या राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर भाजपाची भूमिका मांडतात. शायना एनसी सध्या प्रसार भारती मंडळाच्या सदस्या आहेत.

  • 9/15

    शायना एनसी यांच्या पतीचं नाव मनीष मुनोत आहे. मनीष मुनोत हे पेशाने बिल्डर आहेत. मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर म्हणून त्यांचं नाव आहे.

  • 10/15

    शायना एनसी केवळ राजकीय नेत्याच नाहीत, तर त्यांचं नाव फॅशन जगतात प्रसिद्ध आहे.

  • 11/15

    शमा मोहम्मद. काँग्रेसनं २०१८मध्ये शमा मोहम्मद यांना मीडिया पॅनलिस्टची जबाबदारी सोपवली. पक्षाची प्रवक्ता इतकीच त्यांची ओळख नाही, तर त्या डॉक्टरही आहेत.

  • 12/15

    शमा मोहम्मद यांच्या पतीचं नाव स्टेफनो पेल्ले आहे. स्टेफनो पेल्ले काय काम करतात, याबद्दल फारशी माहिती नाही.

  • 13/15

    शमा मोहम्मद व स्टेफनो यांना दोन मुलं आहेत. हा फोटो शमा मोहम्मद यांनी ईदच्या दिवशी ट्विट केला होता.

  • 14/15

    पत्रकार शाजिया इल्मी आता राजकीय नेत्याच्या भूमिकेत आहेत. त्यांनी राजकीय कारकीर्दीला आम आदमी पक्षातून सुरूवात केली.

  • 15/15

    काही वर्षानंतर त्यांनी आम आदमी पार्टीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. शाजिया इल्मी या उत्तर प्रदेश कानपूरच्या रहिवाशी आहेत. इल्मी यांच्या पतीचं नाव साजिद मलिक आहे. साजिद मलिक हे इव्हेस्टमेंट बँकर आहेत.

Web Title: Priyanka chaturvedi to shain nc know about women political leaders husband bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.