• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. russian vaccine maker ties up with dr reddy s labs for supply of hundred million doses of sputnik v shot in india dmp

मोठी बातमी – रशियन लशीचे भारतात उपलब्ध होणार १० कोटी डोस, या कंपनी बरोबर केला करार

September 16, 2020 17:02 IST
Follow Us
  • मोठी बातमी – रशियन लशीचे भारतात उपलब्ध होणार १० कोटी डोस, या कंपनी बरोबर केला करार
    1/

  • 2/

    मागच्या काही दिवसांपासून या लसीसाठी भारताची रशियन लस निर्मात्यांबरोबर चर्चा सुरु होती. गमालेया संशोधन संस्थेने ही लस विकसित केली आहे.

  • 3/

    रशियाने या लशीबद्दलची महत्त्वाची माहिती सुद्धा भारताला दिली होती. रशियाने डॉ. रेड्डी लॅबोरटरीज बरोबर करार केला आहे.

  • 4/

    रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडने (RDIF) ही माहिती दिली. डॉ. रेड्डी लॅबला रशिया स्पुटनिक व्ही लशीचे ट्रायल म्हणजे चाचणी आणि वितरणासाठी १० कोटी डोस देणार आहे.

  • 5/

    लशीची मानवी चाचणी म्हणजे क्लिनिकल ट्रायल आणि भारतात वितरणासाठी डॉ. रेड्डी लॅबला सहकार्य करणार असल्याचे RDIF ने सांगितले. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर प्रक्रिया लगेच सुरु होईल असे आरडीआयएफकडून सांगण्यात आले आहे.

  • 6/

    रशियाच्या या लशीवर जगभरातून बरीच टीका झाली होती. कारण तिसऱ्या फेज आधीच या लशीला मान्यता देण्यात आली होती.

  • 7/

    १०० पेक्षा कमी जणांवर लशीची चाचणी केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी ही लस रशियात उपलब्ध करुन देण्यात आली. पुरेशा चाचणीअभावी ही लस हानीकारक ठरु शकते असे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत होते.

  • 8/

    काही दिवसांपूर्वी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही लस सुरक्षित असल्याचे म्हटले होते.

  • 9/

    लशीचा डोस दिल्यानंतर ठराविक दिवसांनी अँटीबॉडीज शरीरात तयार झाल्या असे अहवालात म्हटले होते.

  • 10/

    चाचणीमध्ये यशस्वी ठरल्यास पुढच्यावर्षीपर्यंत ही लस उपलब्ध होऊ शकते. भारतात सध्या कोव्हॅक्सीन, ऑक्सफर्ड आणि झायडसने विकसित केलेल्या लशीच्या मानवी चाचण्या सुरु आहेत. (Photo: Reuters)

Web Title: Russian vaccine maker ties up with dr reddy s labs for supply of hundred million doses of sputnik v shot in india dmp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.