जगातील सर्वांत श्रीमंत दाम्पत्यांच्या यादीत मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. व्यावसायिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या असताना स्वत:साठी आणि पती किंवा पत्नीसाठी वेळ काढणं कठीण होऊन जातं. अशातच एका मुलाखतीत नीता अंबानी यांना प्रश्न विचारला गेला की, तुम्ही आणि मुकेश अंबानी इतर सामान्य कपल्ससारखे डेटवर जाता का? फेमिना या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर नीता म्हणाल्या, "माझ्या आणि मुकेश अंबानींच्या लग्नाला ३५ हून अधिक वर्षे झाली आहेत आणि आम्ही आजही एकमेकांवर जिवापाड प्रेम करतो." "ते माझे सर्वांत चांगले मित्र आहेत. नुकताच माझा वाढदिवस आम्ही संपूर्ण कुटुंबीयांसोबत साजरा केला होता", असं त्यांनी पुढे सांगितलं. "बऱ्याचदा आमचे प्लॅन हे अचानकच ठरतात. मुकेश कधी अचानकच म्हणतात की चल कॉफी प्यायला जाऊ आणि आम्ही तेव्हा एकमेकांसोबत निवांत वेळ घालवतो," असं त्या म्हणाल्या. "सर्वसामान्य कपल्सप्रमाणेच आम्हीसुद्धा भेळपुरी, शेवपुरी खाण्यासाठी घराबाहेर पडतो. कारण आम्हा दोघांनाही स्ट्रीट फूड फार आवडतं," असं त्यांनी सांगितलं. कामाच्या व्यापामुळे मुकेश अंबानी घरी कितीही उशिरा आले तरी नीता त्यांच्यासोबत जेवण्यासाठी थांबतात. सर्व छायाचित्र सौजन्य- सोशल मीडिया
“तुम्ही मुकेश अंबानींसोबत डेटवर जाता का?”; नीता अंबानींनी दिलं हे उत्तर
Web Title: Reliance chief mukesh ambani private life nita ambani revealed about her love ssv