-
उत्तर कोरिया हा जगभरामध्ये कायम चर्चेत असणारा असा हुकमशाही असणारा देश आहे. किम जोंग उन हा इथला हुकुमशाह आहे. उत्तर कोरिया सरकारने देशभरात पॉर्नविरूद्ध मोहीम सुरू केली आहे. सत्ताधारी कामगार पक्षानेही शाळांमध्ये अश्लीलतेविरूद्ध जनजागृती मोहीम राबविली आहे. याच मोहिमेअंतर्गत पॉर्न पाहताना पकडलेल्या मुलाला किम जोंग उन यांनी भयानक शिक्षा दिली आहे.
-
उत्तर कोरियामध्ये अश्लील साहित्य तयार करण्यास तसेच खरेदी विक्री करताना आढळल्यास थेट मृत्यूदंडच्या शिक्षेचेही तरतूद आहे. देशातील हुकूमशहा किम जोंग उनला वाटते की अश्लील साहित्यामुळे समाज नष्ट होतो. याच कारणामुळे पॉर्न पाहताना पकडलेल्या मुलाला किम जोंग उन यांनी भयानक शिक्षा दिलीय.
-
'डेली एनके'ने दिलेल्या वृत्तानुसार, सिनउईजू गावात एक मुलगा त्याच्या आई-वडीलांसोबत राहत होता. रात्री हा मुलगा पॉर्न पाहत होता.
-
पॉर्न पाहण्यावर बंदी असणाऱ्या देशामध्ये हा मुलगा गुन्हा करण्यास मागिल मुख्य कारण ठरलं त्याचे पालक घरी नसणं. हा मुलगा पॉर्न पाहत असताना घरी एकटाच असल्याची माहिती समोर आलीय.
-
उत्तर कोरिया पोलिसांनी या मुलाचा आयपी अॅड्रेसच्या आधारे शोध घेतला आणि त्याला रंगेहाथ पकडलं.
-
पॉर्न पाहण्याची शिक्षा म्हणून, मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला सगळ्या लोकांपासून दूर पाठवण्यात आले आहे. त्यांना सगळ्यांना बॉर्डरच्या जवळ पास असलेल्या भागात पाठवण्यात आलं आहे. एक प्रकारे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
-
अनेकांनी तर या मुलाने स्वत: ला भाग्यवान मानले पाहिजे असं म्हटलं आहे. किम जोंग उन याचे आधीचे निर्णय पाहता या मुलाला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली नाही हे त्याचं भाग्य असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे.
-
हा शाळकरी मुलगा असल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनासुद्धा शिक्षा देण्यात आली . उत्तर कोरियाच्या कायद्यांनुसार शाळेत जाणाऱ्या मुलांनी कोणतीही चूक केली तर त्याची जबाबदारी ही त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची असते.
-
येथील नियमांनुसार जेव्हा एखादा शिक्षक किंवा मुख्याध्यापक त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाही किंवा अयशस्वी होतो, तेव्हा त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे. अशा शिक्षकांना कामगार कॅम्पमध्ये पाठविण्यात येते.
-
उत्तर कोरियामध्ये पॉर्न साहित्य तयार करण्यास आणि त्या विकत घेणाऱ्यास किंवा विकल्या गेलेल्या लोकांना ५ ते १५ वर्षांची शिक्षा किंवा मृत्यूदंडही दिला जातो. उत्तर कोरियातील अनेक कायदे हे अत्यंत कठोर आहेत. (All photo credit : AP)
पॉर्न पाहण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या शाळकरी मुलाला किम जोंग उनने दिली भयानक शिक्षा
Web Title: Teenage boy caught watching pornography exiled to countryside with family dcp