• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. goa trip craze continues 5 million tourists to visit goa in the first half of 2025 aam

‘गोवा ट्रिप’ची क्रेझ कायम; २०२५ मध्ये ५० लाख पर्यटकांची गोव्यास भेट

Goa Tourists: पर्यटन संचालक केदार नाईक यांनी गोव्याने स्वीकारलेल्या बहुआयामी दृष्टिकोनामुळे पर्यटकांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे.

July 20, 2025 14:53 IST
Follow Us
  • Goa Tourist in 2025
    1/9

    गोवा पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२५ च्या पहिल्या सहामाहीत गोव्यात ५४.५५ लाख पर्यटकांचे आगमन झाले, ज्यामध्ये देशांतर्गत पर्यटकांचा वाटा ५१.८४ लाख होता. उर्वरित २.७१ लाख पर्यटक आंतरराष्ट्रीय पर्यटक होते.

  • 2/9

    जानेवारी २०२५ मध्ये गोव्याला सर्वाधिक १०.५६ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. ज्यामध्ये ९.८६ लाख देशांतर्गत आणि जवळजवळ ७०,००० परदेशी पर्यटकांचा समावेश होता.

  • 3/9

    त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ९.०५ लाख पर्यटक आले, ज्यामध्ये ८.४४ लाख देशांतर्गत आणि ६१,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक होते.

  • 4/9

    मार्चमध्ये ८.८९ लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. ज्यामध्ये ८.३२ लाख भारतातील आणि सुमारे ५६,००० परदेशातून आले असल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली.

  • 5/9

    उन्हाळ्याच्या महिन्यांतही पर्यटकांचा हा ट्रेंड कायम राहिला. एप्रिलमध्ये, गोव्यात ८.४२ लाख पर्यटक गेले होते, ज्यात ८.१४ लाख देशांतर्गत आणि २८,००० आंतरराष्ट्रीय पर्यटक होते.

  • 6/9

    त्यानंतर मे महिन्यात ९.२७ लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. ज्यात ८.९७ लाख देशांतर्गत आणि जवळजवळ ३०,००० परदेशी पर्यटक होते.

  • 7/9

    जूनमध्ये एकूण ८.३४ लाख पर्यटकांची नोंद झाली, ज्यामध्ये ८.०८ लाख देशांतर्गत आणि सुमारे २५,००० आंतरराष्ट्रीय पर्यटक होते, अशी माहिती गोव्याच्या पर्यटन विभागाने दिली आहे.

  • 8/9

    २०२५ च्या पहिल्या सहामाहीत गोव्यात पर्यटकांच्या संख्येचा आलेख उल्लेखनीय उंचीवर पोहोचला आहे, ज्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पर्यटकांच्या आगमनात विक्रमी वाढ झाली आहे.

  • 9/9

    यामुळे भारतातील सर्वात पसंतीच्या आणि विकसित होणाऱ्या पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून गोव्याचा दर्जा आणखी मजबूत झाला आहे, असे गोवा पर्यटन विभागाच्या निवेदनात नमूद केले आहे.

TOPICS
गोवाGoaपर्यटनTourism

Web Title: Goa trip craze continues 5 million tourists to visit goa in the first half of 2025 aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.