-
‘रिच डॅड पुअर डॅड’ या पुस्तकासाठी प्रसिद्ध असलेले रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल कडक इशारा दिला आहे.
-
सोशल मीडियावरील अलीकडील पोस्टमध्ये त्यांनी असा दावा केला आहे की, बाजार कोसळण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि म्हटले आहे की बाँड्ससारख्या पारंपारिक गुंतवणूकी अनेकांच्या मते तितक्या सुरक्षित नाहीत.
-
“आर्थिक व्यवस्थापक जेव्हा म्हणतात की, बाँड्स सुरक्षित आहेत तेव्हा खोटे बोलतात”, असे कियोसाकी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.
-
“बाजारपेठेतील घसरणीत काहीही सुरक्षित नसते”, यावेळी त्यांनी अनेक धोक्याच्या चिन्हांकडे लक्ष वेधले आणि व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्र “क्रॅश होत आहे” असे म्हटले आहे.
-
कियोसाकी यांनी पुढे असेही म्हटले की, क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने अमेरिकन बाँड्सचे मूल्य कमी केले असून, कोणीही बाँड्स खरेदी करण्यासाठी येईना झाले आहे.
-
कियोसाकी यांनी आशियातील गुंतवणूकदार सोन्याकडे कसे वळत आहेत यावरही प्रकाश टाकला, ज्यामुळे जगभरातील बरेच लोक त्यांची संपत्ती साठवण्यासाठी सुरक्षित पर्याय शोधू लागले आहेत असे सूचित होते.
-
रॉबर्ट कियोसाकी म्हणाले की, ते सोने, चांदी, बिटकॉइन, तेल आणि गुरेढोरे यामध्ये गुंतवणूक करून वर्षानुवर्षे यासाठी तयारी करत आहेत.
-
कियोसाकी यांच्या मते, आर्थिक मंदीच्या काळात या प्रकारच्या मालमत्ता चांगले संरक्षण देतात. त्यांचा असा विश्वास आहे की, एक मोठा अपघात आणि कदाचित आणखी एक महामंदी येणार आहे.
-
कियोसाकी यांनी यावेळी लोकांना त्यांच्या आर्थिक भविष्याबद्दल विचार करण्यास आणि कठीण काळात संपत्ती गमावण्याऐवजी ती वाढवण्यास मदत करणारे निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले.
-
“तुम्ही श्रीमंत व्हायचे आहे की गरीब?” असे विचारत त्यांनी त्यांच्या एक्सवरील फॉलोअर्सला विचारले आणि लोकांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करणे हे त्यांचे ध्येय असल्याचे सांगितले.
-
कियोसाकी हे सोने आणि बिटकॉइनचे दीर्घकाळापासूनचे समर्थक आहेत, ते अनेकदा लोकांना पारंपारिक गुंतवणुकीपलीकडे पाहण्याचा सल्ला देतात, विशेषतः अनिश्चित काळात. (All Photos: @theRealKiyosaki/X)
“आणखी एक महामंदी…”, ‘रिच डॅड, पुअर डॅड’च्या लेखकाचा इशारा; म्हणाले, “संपत्ती गमावण्याऐवजी…”
Rich Dad Poor Dad Author: “आर्थिक व्यवस्थापक जेव्हा म्हणतात की, बाँड्स सुरक्षित आहेत तेव्हा खोटे बोलतात”, असे कियोसाकी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.
Web Title: Rich dad poor dad author robert kiyosaki warns stocks and bonds not safe investors to prepare for financial crash aam