-
बेलराईज इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमोटर आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे यांनी अधिकृतपणे अब्जाधीशांच्या यादीत प्रवेश केला आहे.
-
श्रीकांत बडवे यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६५ रोजी पुण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आहे.
-
त्यांनी १९८७ मध्ये औरंगाबाद येथील जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातू इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्समध्ये अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले आहे.
-
१९८८ मध्ये बडवे यांनी त्यांच्या कंपनीचा पहिला कारखाना स्थापन केला होता. त्यांची पहिल्या वर्षी उलाढाल केवळ १ लाख रुपये होती.
-
आज देशभरात त्यांच्या कंपनीचे २० हून अधिक कारखाने असून एकूण उलाढाल ७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
-
१९९५-९६ मध्ये श्रीकांत बडवे यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते उद्योजकता आणि गुणवत्तेसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.
-
पुढे २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते लघु उद्योगांमध्ये संशोधन आणि विकासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे बडवे इंजिनिअरिंग लिमिटेड ही तिन्ही पुरस्कार मिळवणारी एकमेव कंपनी आहे.
-
श्रीकांत बडवे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग शाखेचे संयोजक आहेत.
-
श्रीकांत बडवे यांच्या बेलराईज ग्रुपच्या देशभरातील विविध कारखान्यांमधून ८,००० हून अधिक लोकांना रोजगार मिळत आहे.
-
श्रीकांत बडवे महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक सल्लागार परिषदेवर देखील काम करतात. याचबरोबर ते सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित आणि शंकर महादेवन यांच्यासोबत मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि मेक इन इंडियाचे ब्रँड अॅम्बेसेडरही आहेत. (All Photos: Badve Shrikannt/Facebook)
पुणेकर श्रीकांत बडवे यांनी मिळवलं अब्जाधीशांच्या यादीत स्थान; जाणून घ्या त्यांच्याबाबतच्या १० गोष्टी
Shrikant Badve Journy: श्रीकांत बडवे यांचा बेलराईज इंडस्ट्रीजमध्ये ५९.५६ टक्के हिस्सा आहे. त्यांच्याकडे एकूण ५३ कोटी शेअर्स असून, याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार ९,५५० कोटी रुपये आहे.
Web Title: Punekar shrikant badve has made it to the billionaire list know 10 things about him aam