-
अर्कांससमधील बेंटनव्हिल येथे झालेल्या कार्यबल परिषदेत, वॉलमार्टचे सीईओ डग मॅकमिलन यांनी, येत्या काळात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) काम करण्यास सक्षम होणार असल्याचे म्हटले आहे.
-
“हे अगदी स्पष्ट आहे की, एआयचा अक्षरशः प्रत्येक नोकरीवर परिणाम होणार आहे. कदाचित जगात अशी एखादीच नोकरी असेल ज्यावर एआयचा परिणाम होणार नाही, पण मला तरी अजून अशी एकही नोकरी माहिती नाही ज्यावर एआयचा परिणाम होणार नाही”, असे डग मॅकमिलन यांनी स्पष्ट केले.
-
डग मॅकमिलन यांचे हे विधान दर्शवते की, जगभरातील प्रमुख कंपन्यांमध्ये आता ही गोष्ट मोठ्या प्रमाणात मान्य केली जात आहे की, एआयमुळे नोकऱ्यांच्या बाजारपेठेत अपेक्षेपेक्षा खूप वेगाने आणि मोठे बदल होणार आहेत.
-
फोर्ड, जेपी मॉर्गन चेस आणि अॅमेझॉन यांसारख्या कंपन्यांनीही नोकऱ्यांवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत अशाच प्रकारचे इशारे दिले आहेत, असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
-
वॉलमार्टचे जगभरात २.१ दशलक्ष कामगार आहेत. ती सर्वाधिक रोजगार देणारी जगातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे.
-
दरम्यान, वॉलमार्टने म्हटले आहे की पुढील तीन वर्षांत त्यांची एकूण कर्मचारी संख्या स्थिर राहण्याची शक्यता आहे. परंतु त्या नोकऱ्यांचे स्वरूप बदलत आहे.
-
काही नोकऱ्या संपुष्टात येतील. कारण वेअरहाऊस ऑटोमेशन, एआय-चालित चॅटबॉट्स आणि बॅक-ऑफ-स्टोअर ऑटोमेशनमुळे आधीच काही विशिष्ट पदे कमी केली जात आहेत.
-
वॉलमार्टने आधीच त्यांच्या विविध प्रकारच्या कामकाजामध्ये एआयचा वापर सुरू केला आहे. ज्यामध्ये ग्राहक, पुरवठादार आणि कर्मचाऱ्यांसाठी चॅटबॉट्स एजंट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (All Photos: @WalmartNews/X)
AI चा नोकऱ्यांवर काय आणि किती परिणाम होणार? वॉलमार्टचे सीईओ म्हणाले, “अशी एकही नोकरी नाही, ज्यावर…”
Impact Of AI On jobs: वॉलमार्टचे जगभरात २.१ दशलक्ष कामगार आहेत. ती सर्वाधिक रोजगार देणारी जगातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आहे.
Web Title: Ai impact on jobs doug mcmillon walmart ceo how ai will affect jobs artificial intelligence job disruption every job affected by ai aam