• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. sridhar vembu net worth 2025 net worth of arattai founder zoho founder wealth how rich indian tech billionaire valuation aam

WhatsApp ला भारतात आव्हान निर्माण करू पाहणाऱ्या Arattai मेसेजिंग अ‍ॅपच्या संस्थापकांची एकूण संपत्ती किती आहे?

Shridhar Vembu Net worth: अरत्ताई मेसेजिंग अ‍ॅपमध्ये युजर्सना ग्रुप चॅट्स, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स, स्टोरीज आणि ब्रॉडकास्ट चॅनल्स यासारखी फिचर्स मिळतात.

September 30, 2025 16:07 IST
Follow Us
  • net worth of sridhar vembu
    1/7

    झोहो कॉर्पोरेशनने विकसित केलेल्या अरत्ताई या मेसेजिंग अ‍ॅपची तंत्रज्ञान जगतात जोरदार चर्चा सुरू आहे.
    गेल्या तीन दिवसांत या अ‍ॅपवर साइन-अप करणाऱ्या युजर्समध्ये १०० पट वाढ झाली आहे आणि याकडे भारतात मेटाच्या व्हॉट्सअ‍ॅपला संभाव्य आव्हान म्हणून पाहिले जात आहे.

  • 2/7

    मेड इन इंडिया अरत्ताईने युजर्सना प्रियजनांशी आणि व्यावसायिकांशी संपर्क साधण्यासाठी स्पायवेअर-प्रूफ प्लॅटफॉर्म म्हणून स्थान मिळवले आहे. झोहो आणि अरत्ताई दोघांचेही शिल्पकार श्रीधर वेम्बू हे अ‍ॅपच्या अचानक वाढलेल्या लोकप्रियतेमुळे तितकेच रोमांचित झाले आहेत. या बहुचर्चित अ‍ॅपमागील श्रीधर वेंबू यांची एकूण संपत्ती किती आहे जाणून घेऊया.

  • 3/7

    १९६८ मध्ये जन्मलेले श्रीधर वेम्बू हे एक अत्यंत यशस्वी भारतीय उद्योगपती आणि झोहो कॉर्पोरेशनचे संस्थापक आहेत. २०२४ च्या आकडेवारीनुसार, ते फोर्ब्सच्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ३९ व्या क्रमांकावर आहेत, त्यांची एकूण संपत्ती ५.८५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

  • 4/7

    तंत्रज्ञान उद्योग आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाची दखल घेत, भारत सरकारने २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

  • 5/7

    ९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या फोर्ब्स इंडियाच्या टॉप १०० श्रीमंतांच्या यादीनुसार, श्रीधर वेम्बू आणि त्याचे भावंड ५.८ अब्ज डॉलर्सच्या एकत्रित संपत्तीसह ५१ व्या स्थानावर आहेत.

  • 6/7

    तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील एका गावात एका सामान्य तमिळ ब्राह्मण कुटुंबात त्यांचे संगोपन झाले.

  • 7/7

    त्यांनी आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले, १९८९ मध्ये पदवी प्राप्त केली आणि १९९४ मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली.

  • 8/7

    उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर, वेम्बू यांनी क्वालकॉममध्ये सिस्टम्स डिझाईन इंजिनिअर म्हणून व्यावसायिक कारकीर्द सुरू केली आणि वायरलेस तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले. पण, तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी पदे मिळवण्यापेक्षा वेम्बू यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या या असामान्य निर्णयामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले, पण तेच आता त्यांच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू बनला आहे

  • 9/7

    जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांना पर्याय म्हणून भारतीय पर्याय निर्माण करण्याच्या वेम्बू यांच्या दृष्टिकोनातून झोहोने २०२१ मध्ये अरत्ताई हे मेसेजिंग अ‍ॅप सादर केले. अरत्ताई या तमिळ शब्दाचे “कॅज्युअल चॅट” असे भाषांतर आहे.

  • 10/7

    गेल्या काही दिवसांत हे अ‍ॅप भारतातील डाउनलोड चार्टमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहे. अरत्ताई मेसेजिंग अ‍ॅपमध्ये युजर्सना ग्रुप चॅट्स, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स, स्टोरीज आणि ब्रॉडकास्ट चॅनल्स यासारखी फिचर्स मिळतात. (All Photo: @svembu/X)

TOPICS
बिझनेसBusinessबिझनेस न्यूजBusiness Newsमाहिती तंत्रज्ञानInformation Technologyसोशल मीडियाSocial Media

Web Title: Sridhar vembu net worth 2025 net worth of arattai founder zoho founder wealth how rich indian tech billionaire valuation aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.