• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. mrbeast opinion on ai in content creation how ai affects youtube content creators aam

AI मुळे जगातील सर्वात श्रीमंत यूट्यूबरही चिंतेत; कंटेंट क्रिएटर्सबाबत MrBeast ने व्यक्त केली भीती

MrBeast On AI: जेव्हा अशा पातळीवरचा प्रभाव असलेला कोणीतरी मानवी सर्जनशीलतेची जागा एआय घेत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतो तेव्हा लोकही त्याची दखल घेतात.

Updated: October 9, 2025 15:41 IST
Follow Us
  • mrbeast worried of use of ai in content creation
    1/8

    कंटेंट क्रिएशनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापराबद्दल अस्वस्थ असलेल्या कंटेंट क्रिएटर्समध्ये युट्यूबचा सर्वात मोठा स्टार, मिस्टर बीस्टदेखील सहभागी झाला आहे.

  • 2/8

    स्वतः एआय टूल्सचा प्रयोग करणाऱ्या मिस्टर बीस्टने कबूल केले की, ऑनलाइन उपजीविका असणाऱ्या लाखो लोकांवर या तंत्रज्ञानाचा कसा परिणाम होऊ शकतो याबद्दल त्याला चिंता आहे. येणारा काळ भयानक असल्याचेही त्याने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे.

  • 3/8

    मिस्टर बीस्ट केवळ एक युट्यूबर नाही, तर तो फोर्ब्सच्या २०२५ च्या कंटेंट क्रिएटर्सच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न अंदाजे ८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके आहे.

  • 4/8

    जेव्हा अशा पातळीवरचा प्रभाव असलेला कोणीतरी मानवी सर्जनशीलतेची जागा एआय घेत असल्याबद्दल चिंता व्यक्त करतो तेव्हा लोकही त्याची दखल घेतात.

  • 5/8

    ओपनएआयने त्यांच्या शक्तिशाली एआय व्हिडिओ जनरेटरची नवीन आवृत्ती सोरा २ लाँच केल्यानंतर लगेचच एमआर बीस्टने ही टिप्पणी केली होती. त्यासोबतच, कंपनीने एक मोबाइल ॲप लाँचे केले आहे, जे युजर्सना स्वतःचे एआय व्हिडिओ तयार करून देते. जे टिकटॉक-शैलीच्या वर्टिकल फीडमध्ये शेअर केले जाऊ शकतात. हे ॲप आधीच यूएस ॲप स्टोअरच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचले आहे, जे एआय व्हिडिओ जनरेशन किती वेगाने लोकप्रिय होत आहे हे दर्शवते.

  • 6/8

    गेल्या काही काळात युट्यूब देखील एआयकडे झुकत असल्याचे पाहायला मिळत आहे. युट्यूबने अलीकडेच असे एडिटिंग टूल आणले आहे जे फोटो अ‍ॅनिमेट करू शकते किंवा व्हीईओ सारख्या एआय मॉडेल्सचा वापर करून त्याचे व्हिडिओमध्ये रुपांतर करू शकतात.

  • 7/8

    युट्यूब स्टुडिओमधील एआय चॅटबॉट कंटेंट क्रिएटर्सना त्यांचे चॅनेल व्यवस्थापित करण्यास देखील मदत करत आहे.

  • 8/8

    मनोरंजक गोष्ट म्हणजे, मिस्टर बीस्टने यापूर्वी एआयबरोबर प्रयोग केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, त्याचा विश्लेषण प्लॅटफॉर्म, व्हिव्हस्टॅट्सने व्हिडिओ थंबनेल जनरेट करण्यासाठी एआय टूल लाँच केले होते. तेव्हा त्याला टीकेचा सामना करावा लागला. कलाकार आणि प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिक्रियेनंतर, त्याने याचा वापर बंद केला. (All Photos: @MrBeast/X)

TOPICS
चॅटजीपीटीChatgptयुट्यूबYoutubeसोशल मीडियाSocial Media

Web Title: Mrbeast opinion on ai in content creation how ai affects youtube content creators aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.