-

रिच डॅड पूअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि बिटकॉइनमधील तीव्र घसरण याकडे लक्ष वेधले आहे.
-
कियोसाकी बाजारात मंदी असूनही त्यांची बिटकॉइनमधील गुंतवणूक कमी करणार नाहीत. त्यांनी असा युक्तिवाद केला की, सध्याची विक्री रोख रकमेसाठी जागतिक स्तरावरील वाढत्या मागणीमुळे होत आहे.
-
एक्सवरील एका सविस्तर पोस्टमध्ये, रिच डॅड पूअर डॅडचे लेखक सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे वर्णन दबावाचा भाग म्हणून करतात, परंतु ते त्यांच्या गुंतवणुकीवरच लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-
कियोसाकी म्हणाले की, जगातील वाढती कर्जस्थिती आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक विस्ताराची संभाव्य सुरुवात, ज्याचे ते “द बिग प्रिंट” म्हणून वर्णन करतात, हे त्यांच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचे केंद्रबिंदू आहेत.
-
जोखीम मान्य करताना त्यांचा असा विश्वास आहे की, हे वातावरण शेवटी सोने, चांदी, बिटकॉइन आणि इथरियम सारख्या मालमत्ता अधिक मौल्यवान बनवू शकते.
-
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आर्थिक स्थितीमुळे ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते जे काही भाष्य करत आहेत त्याला गुंतवणूक सल्ला समजू नये.
-
पोस्टमध्ये आपला दृष्टिकोन शेअर करताना कियोसाकी यांनी लिहिले, “बिटकॉइन कोसळत आहे. सर्व बुडबुडे फुटत आहेत.” जेव्हा त्यांना तुम्ही बिटकॉइन विकणार का? असे विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “नाही, मी आणखी चांगल्या परताव्याची वाट पाहणार आहे.”
-
त्यांचे तर्क स्पष्ट करताना ते म्हणाले, “सर्व बाजारपेठा कोसळण्याचे कारण म्हणजे जगाला रोख रकमेची गरज आहे. मला रोख रकमेची गरज नाही.” त्यांच्या मते, ते एका महत्त्वपूर्ण आर्थिक घटनेची अपेक्षा करत आहेत आणि म्हणूनच ते त्यांची गुंतवणूक विकण्याचा कोणताही विचार करत नाहीत.
बिटकॉइनमध्ये घसरण का होत आहे? ‘रिच डॅड पूअर डॅड’चे लेखक म्हणाले, “जगाला…”
Robert Kiyosaki Bitcoin crash analysis: रिच डॅड पूअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि बिटकॉइनमधील तीव्र घसरण याकडे लक्ष वेधले आहे.
Web Title: Robert kiyosaki bitcoin crash analysis why not selling bitcoin global liquidity crisis impact on crypto market crash prediction big print economic event aam