-
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आज वयाच्या ३५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. आयसीसीच्या तिनही मुख्य स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नाव आघाडीवर नेऊन ठेवण्याचे काम धोनीने केले. ट्वेन्टी-२० विश्वचषक, २०११ साली मायभूमीत एकदिवसीय विश्वचषक आणि २००७ साली कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठून भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या धोनीच्या लक्षवेधी कामगिरीवर एक नजर..
-
संघासाठी १०० हून अधिक सामने जिंकून देणारा भारताचा पहिला कर्णधार म्हणून धोनीचे नाव घेतले जाते. जलदगतीने ८ हजार धावा करण्याचा विक्रम करणारा धोनी चौथा खेळाडू आहे. (Source: ICC)
-
२०१३ साली भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्त्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. एकही सामना न गमावता भारत अंतिम फेरी पोहोचला होता. (Source: Reuters)
-
तब्बल २८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०११ साली धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. धोनीने २७८ एकदिवसीय सामन्यात ८९.२७ सरासरीने ८९१८ धावा कुटल्या. ३१ ऑक्टोबर २००५ साली धोनीने श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८४ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यातील धोनीची ही सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आहे.
-
धोनीच्या नेतृत्तवात भारतीय संघाने कसोटी संघांच्या क्रमवारीत तब्बल १८ महिने अव्वल स्थानी कायम राहिल्याची किमया साधली. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये ९० सामन्यांत ४८७६ धावा ठोकल्या आहेत.
-
धोनी हा भारतीय संघाचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार राहिला आहे. याशिवाय, मैदानाबाहेर देखील धोनीने अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. १ नोव्हेंबर २०११ साली भारती लष्कराने धोनीला लेफ्टनंट कर्नल पदवी बहाल केली. याआधी लष्कराने कपिल देव यांना ही पदवी दिली होती. (Source: Instagram)
हॅपी बर्थ डे धोनी, ‘कॅप्टनकूल’च्या कामगिरीवर एक नजर..
भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आज वयाच्या ३५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. आयसीसीच्या तिनही मुख्य स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नाव आघाडीवर नेऊन ठेवण्याचे काम धोनीने केले.
Web Title: Ms dhoni turns 35 achievements of the captain cool