-
भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत असणारा विराट कोहली आज आपल्या २९ व्या वर्षात पदार्पण करत आहे. देशभरातून विराट कोहलीने असंख्य चाहते त्याच्या वाढदिवशी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
-
खेळपट्टीवर दाखल होताच अगदी पहिल्या चेंडूपासूनच प्रतिस्पर्धी गोलंदाजाकडे रोखून पाहणाऱया या आक्रमक खेळाडूने जोपासलेल्या ‘विराट’ ध्येयासक्तीने अनेकांच्या मनात घर केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून आपल्या आक्रमक आणि तितक्याच नजाकती खेळींनी विराट कोहलीने भारतीय संघासाठी अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. -
एकट्या विराट कोहलीवर आज भारतीय क्रिकेट चाहते विजयी आशा ठेवून असतात.
-
गेल्या काही वर्षांपासून विराट कोहली नावाचा हा हरहुन्नरी फलंदाज आपल्या लक्षवेधी कामगिरीने भारतीय संघातील ध्रुवतारा बनला आहे.
-
त्याने खेळपट्टीवर मोठ्या आत्मविश्वासाने उभे राहून आऊट साईड द ऑफ स्टम्पवर आलेला चेंडू आपल्या बॉटम हॅण्डमधील प्रबळ ताकदीने लगावलेला स्वेअर ड्राईव्ह असो किंवा ऑन साईडला मिड विकेट आणि मिड ऑनच्या मधून मारलेला फ्लिक असो, नाही तर बाऊन्सवर डीप स्वेअर लेगला मारलेला पूल शॉट..स्टेडियमच्या सर्वच बाजूंना विराट कोहली अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने फटके लगावतो.
-
विराटच्या याच कौशल्याचा धसका जगातील सर्वोत्तम गोलंदाजांनी घेतला आहे. विराट कोहलीने नावाचे हे समीकरण सर्वच प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांसाठी काळागणीक कठीण होत चालले आहे.
-
भारतीय संघाच्या या आश्वासक भविष्याचा देशातील सर्वच क्रीडा रसिकांनी स्विकार केला आहे.
-
क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे मैदानाबाहेरही विराट कोहली तितकाच लोकप्रिय राहिला आहे.
-
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबतचे विराटचे प्रेमकरण चर्चेचा विषय आहे.
-
विराट कोहली हा भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ‘इंडियन सुपरहिरो’ बनलाय.
-
इंडियन प्रीमिअर लीगमध्येही विराटने आपल्या फलंदाजीची जादू दाखवून दिली आहे.
-
भारतीय क्रिकेट संघाच्या सराव शिबिरादरम्यान टिपलेले विराट कोहलीचे छायाचित्र.
-
विराट मैदानात जितक्या निष्ठेने खेळताना दिसतो तितकेच तो वैयक्तिक आयुष्यात देखील सराव आणि आपली फिटनेस राखण्यासाठी मेहनत घेतो. विराटच्या ऑफ फिल्ड मेहनतीचे आजीमाजी खेळाडू अनेकदा कौतुक करतात.
-
महेंद्रसिंग धोनी याच्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी क्रिकेट संघाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.
-
आपल्या चतुरस्त्र खेळाने विराट कोहली भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
-
शतकी कामगिरी केल्यानंतरही अगदी सामन्याचा पहिलाच चेंडू खेळावा अशी उर्जा विराटमध्ये दिसणे हेच त्याच्या ऑफ फिल्ड मेहनतीचे फळ म्हणावं लागेल.
-
फलंदाजीप्रमाणे क्षेत्ररक्षणातील विराटची चपळता डोळे दिपावणारी असते.
Virat Kohli: हॅपी बर्थडे @ विराट कोहली
Web Title: Indian test skipper virat kohli birthday celebration